ह्युगो चावेझ
ह्युगो रफायेल चावेझ फ्रियास (जुलै २८, इ.स. १९५४ - मार्च ५, इ.स. २०१३) हे वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष होते. १९९९ पासून राष्ट्रपती पदावर विराजमान झालेले चावेझ हे एक अत्यंत लोकप्रिय नेते होते. 'क्रांतिकारी बोलिवरियन चळवळ- २००' या राजकिय आणि सामाजिक चळवळीतून १९९७ साली स्थापन झालेल्या 'पाचवी लोकशाही चळवळ' या राजकिय पक्षाचे चावेझ एक मुख्य नेते होते. २००७ मध्ये तो पक्ष 'वेनेझुएला संयुक्त समाजवादी पक्षात' विलीन झाला आणि त्या पक्षाच्या नेतेपदी विराजमान झाले. १९ व्या शतकातील वेनेझुएलातील लष्करी अधिकारी आणि स्वातंत्र्यासाठी झटलेल्या सिमॉन बोलिवर यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेली बोलिवरियन चळवळ आणि २१ व्या शतकातील समाजवाद यांची सांगड घालून अनेक सामाजिक सुधारणा त्यांनी देशभरात राबवल्या. या सुधारणांच्या अंतर्गत संविधानातल्या सुधारणा, नागरी प्रशासन संस्थांमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग, अनेक महत्त्वाच्या व्यवसायांचे राष्ट्रीयीकरण, स्वास्थ्य आणि शिक्षण विभागातील सुधारणा आणि गरिब जनतेचे सुधारलेले जीवनमान अशा गोष्टिंचा समावेश आहे. चावेझ हे लोकशाही समाजवादी विचारसरणीचे व लॅटिन अमेरिकेच्या एकत्रीकरणाचे पुरस्कर्ते होते.[१] चावेझ जागतिकीकरण, अमेरिका व नवमुक्ततावादाचा निंदक आहे..[२]
सामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या चावेझ यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात लष्करी अधिकारी म्हणून केली. वेनेझुएलामधील राजकिय अनास्थेला कंटाळून त्यांनी गुप्तपणे 'क्रांतिकारी बोलिवरियन चळवळ- २००'ची सुरुवात केली. ८० च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी सरकार उलथवून लावण्याच्या प्रयत्नांना वेग दिला. १९९२ मध्ये कारलोस आन्द्रेस पेरेझ यांच्या नेतृत्वाखाली असलेले 'लोकशाही चळवळ' सरकार उलथवून लावण्याचा लष्करी कट त्यांनी आखला. पण हा कट अपयशी ठरला आणि त्यांची दोन वर्षांसाठी रवानगी तुरुंगात झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी समाजवादी विचारसरणीच्या 'पाचवी लोकशाही चळवळ' या राजकिय पक्षाची स्थापना केली आणि पुढे १९९८ मध्ये चावेझ वेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
राष्ट्रपती पदावर निवडून गेल्यावर त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना अधिक अधिकार मिळवून दिले. देशाच्या सरकारी संरचनेत अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणले. २००० मध्ये पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या चावेझ यांनी सहकार चळवळीचा देशात पाया घातला. भूसंपादन आणि जमिनींच्या पुनर्जिवीकरणांची सुरुवात केली. अनेक महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले.२००६ मध्ये ६०%हून अधिक मताधिक्याने त्यांनी आपला विजय नोंदवला. ७ ऑक्टोबर २०१२ रोजी हेनरिक कॅप्रिलेस यांचा पराभव करून चावेझ चौथ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
संदर्भ व नोंदी
- ^ O'Shaughnessy, Hugh (2006-05-22). "Venezuela's President Chavez wins hearts and minds in London". The Observer available at Taipei Times. 2006-12-28 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Ellner, Steve. "The 'Radical' Thesis on Globalisation and the Case of Venezuela's Hugo Chavez" Latin American Perspectives, Vol. 29, No. 6, Globalization and Globalism in Latin America and the Caribbean. (Nov., 2002), pp. 88-93. Stable URL.
- Hugo Chávez en "La Patria Grande de Caracas" Archived 2008-09-19 at the Wayback Machine.