Jump to content

होरी

होरी हा धमार प्रमाणेच एक गीतप्रकार आहे. या प्रकारामध्ये होळी या सणात खेळल्या जाणाऱ्या रंगांचे अभिर, गुलाल, पिचकारी याचे वर्णन होरी गीतामध्ये असते. त्यामुळे धमार आणि होरी यामध्ये साम्य असल्यासारखे वाटते परंतु या दोन्हींमध्ये भेद आहेत. धमार गीत ध्रुपदाप्रमाणे ते धमार या तालात गातात. शब्द्प्रधानता आणि रसभाव ही होरीची वैशिठे आहेत. होरीगीते ही त्रिताल, झपताल, दीपचंदी तालांमध्ये गायली जातात होरीगीते ही सर्वसाधारणपणे पहाडी, भैरवी, पिलू, देस, तिलंग इत्यादी रागांमध्ये गातात.