होन्शू
होन्शू | |
---|---|
होन्शू बेटाचे स्थान | पूर्व आशिया |
क्षेत्रफळ | २,२७,९६२.६ वर्ग किमी |
लोकसंख्या | १०.३ कोटी |
देश | जपान |
होन्शू (本州 (जपानी उच्चार: होन्शूऽ, शब्दशः अर्थ: "मुख्य राज्य" )) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात मोठे बेट आहे. देशाचा बहुतांश भूभाग या बेटाचा बनलेला आहे. होन्शू हे आकाराने जगातील ७वे सर्वात मोठे बेट आहे आणि लोकसंख्येनुसार जागतिक क्रमवारीत इंडोनेशियातील जावा बेटानंतर होन्शू बेटाचा दुसरा क्रमांक लागतो.
जपानमधील बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे होन्शू बेटावर स्थित आहेत. जपानचे ५ भौगोलिक प्रदेश व ३४ प्रांत होन्शू बेटावर वसलेली आहेत.
- चुगोकू — ओकायामा, तोतोरी, यामागुची, शिमाने, हिरोशिमा.
- कन्साई —ओसाका, क्योतो, नारा, मिई, शिगा, वाकायामा, ह्योगो.
- चुबू — इशिकावा, ऐची, गिफू, तोयामा, नागानो, निगाता, फुकुई, यामानाशी, शिझुओका.
- कांतो — इबाराकी, गुन्मा, कानागावा, चिबा, तोक्यो, तोचिगी, सैतामा.
- तोहोकू — अकिता, इवाते, ओमोरी, फुकुशिमा, मियागी, यामागाता.