होआओ लोरेन्सो
जोआओ लोरेन्सो | |
अँगोलाचा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण २६ सप्टेंबर २०१७ | |
मागील | होजे एदुआर्दो दोस सांतोस |
---|---|
ॲंगोलाचा संरक्षणमंत्री | |
कार्यकाळ २२ एप्रिल २०१४ – २६ सप्टेंबर २०१७ | |
जन्म | ५ मार्च, १९५४ लुआंडा |
राजकीय पक्ष | एम.पी.एल.ए. |
धर्म | रोमन कॅथलिक |
जोआओ लोरेन्सो (पोर्तुगीज: João Manuel Gonçalves Lourenço; जन्म: ५ मार्च १९५४) हा आफ्रिका खंडाच्या अँगोला देशामधील एक राजकारणी व देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. पीपल्स मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ ॲंगोला ह्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलेल्या लोरेन्सोच्या नेतृत्वाखाली ह्या पक्षाने २०१७ ॲंगोला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १५० जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले. पक्षाध्यक्ष ह्या पदामुळे लोरेन्सो ॲंगोलाचा राष्ट्राध्यक्ष बनला. त्याने होजे एदुआर्दो दोस सांतोस ह्यांची ३९ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली.