Jump to content

हॉगवॉर्ट्‌स

ग्रेट हॉल फिल्म संच
जादूटोणा आणि जादूगिरीचे हॉगवॉर्ट्‌ज विद्यालय
कथानक हॅरी पॉटर
प्रकार सार्वजनिक विद्यालय; माध्यमिक विद्यालय; निवासी विद्यालय
प्रथम उल्लेख हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन(१९९७ )
अलीकडील उल्लेख फँटॅस्टिक बीस्ट्स :द क्राइम्स ऑफ ग्रीनडेलवाल्ड(२०१८)
स्थापना इसवी सन ९वे ते १०वे शतक
स्थान स्कॉटलँड
अधिपत्य जादू मंत्रालय
प्रमुख
  • पहिले मुख्याध्यापक (११वं शतक)
  • ब्रिटन स्क्रिमेग्योर
  • फिनएअर एन. ब्लॅक(१९वं शतक ते १९२५)
  • अर्मांडो डिपेट(१९२५-१९६०)
  • अल्बस् डंबलडोअर(१९६०-१९९७)
  • डॉलोरस् उंब्रज (१९९६)
  • सेव्रस स्नेप(१९९७-१९९८)
  • मिनर्व्हा मॅकडोनाल्ड (१९९३; १९९८- विद्यमान)
उद्देश (ज्या जन्माच्यावेळी आल्या असतील आणि घुबडाच्या संदेशाद्वारे वयाच्या अकराव्या वर्षी स्वीकारल्या असतील) अश्या चमत्कारी क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
ब्रीदवाक्य लॅटिन: ड्रॅको डोर्मियन्स नन्क्वाम् टिटिलँडस्.

(Latin: Draco dormiens nunquam titillandus) अर्थ: "झोपलेल्या ड्रॅगनला कधीही गुदगुल्या करू नयेत."

हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री हे हॅरी पॉटरच्या कथानकातील जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या निवासी शाळेचे नाव आहे. हे विद्यालय जे. के. रोलिंग यांच्या हॅॅॅॅरी पॉटर कथानकातील पहिल्या सहा भागात महत्त्वाचे आहे.

जे. के. रोलिंग यांनी सांगितल्याप्रमाणे हॉगवॉर्ट्‌ज हे नाव त्यांनी अनवधानाने हॉगवॉर्ट्‌ज या झाडाच्या नावावरून घेतले. कारण कथानक लिहिण्यापूर्वी त्यांनी कीव बागेत हे झाड पाहिले होते.

विद्यालयाचे स्थान व माहिती

जे.के.रोलिंग हॉगवॉर्ट्‌ज विद्यालयाची कल्पना अशा प्रकारे करतात :

एक प्रकारचा प्रचंड, भरकटवणारा, थोडासा भीतिदायक असा मिनारांनी आणि तटरक्षक भिंतींनी घेरलेला व जो मगलूूंना (जादू न येणाााऱ्याांना) बांधता येणार नाही, अर्थात जो जादूने निर्मिलेला असेल असा भव्य किल्ला.

कथानकात हॉगवॉर्ट्‌ज विद्यालय स्कॉटलँडमध्ये कुठे तरी आहे. ह्यात असे भासवण्यात आले आहे की हॉगवॉर्ट्‌जवर व त्याच्या सभोवताली अनेक चमत्कारिक चकव्यांचा आणि मंत्रांचा प्रभाव आहे जेणेकरून मगलूूंना हे स्थान सापडू नये. मगलूंना दिसलेच तर केवळ भग्नावशेष व धोक्याच्या सूचना दिसतात. किल्ल्याच्या परिसरात प्रशस्त मैदान, पुष्पवाटिका, भाज्यांचा मळा, काळे सरोवर, (फॉरबिडन नावाचे) घनदाट जंगल, काही हरितगृहे आणि इतर इमारती, आणि पूर्णाकृती क्वीडिच खेळपट्टी अशा गोष्टी आहेत. तसेच एक घुबडालय (घुबडांचे निवासस्थान) आहे, जिथे विद्यालयाची व विद्यार्थ्यांची घुबडे राहतात. शाळेतील काही खोल्या व जिने हे सतत जागा बदलत असतात. विद्यालयातील जादूगार व जादूगरणींना शाळेच्या परिसरातून "उडन छू करण्यास"(म्हणजे जादूद्वारे एका जागेहूून दुुसऱ्या जाागी गायब होण्याची) सक्त मनाई आहे, मात्र प्राचार्यच या नियमात हस्तक्षेप करू शकतात. वीज किंवा व विद्युत उपकरणे हॉगवॉर्ट्‌ज विद्यालयात आढळत नाहीत.

हॉगवॉर्ट्‌ज काळ्या सरोवराच्या (ब्लॅक लेक) तटावर वसले आहे. या सरोवरात जलनर, जलपरी, ग्रिन्डाय्लो आणि मोठे स्क्विड्स राहतात. हे मोठे स्क्विड्स माणसांवर हल्ले करत नाहीत तर याउलट विद्यार्थी जेव्हा पाण्यात असतात तेव्हा त्यांचे रक्षण करतात.

हॉगवॉर्ट्‌जमध्ये अकरा ते अठरा वर्षांचे विद्यार्थी असून ही सहशिक्षण देणारी निवासी शाळा आहे. रोलिंग यांनी म्हंटल्याप्रमाणेच हॉगवॉर्ट्‌जमध्ये एकूण १००० विद्यार्थी आहेत. नंतर त्यांनी सुचविल्याप्रमाणे ६००० च्या आसपास विद्यार्थी हॉगवॉर्ट्‌जमध्ये असल्याचे सांगितले, तसेच ही संख्या सुद्धा अनियमित असल्याचेही सांगितले. ह्याचमुळे हॅरीसह शिकणाऱ्या केवळ ४०पात्रांचीच निर्मिती झाली.

प्रवेश

कथानकानुसार, हॉगवॉर्ट्‌जमध्ये प्रवेश हा निवडकांनाच आहे. ज्या मुलांमध्ये उपजतच जादूई क्षमता आहेत त्यांना हॉग्वार्ट्झमध्ये आपोआपच प्रवेश मिळतो. मात्र स्क्वीब (अशी मुले ज्यांचे पालक जादूगार असूनही त्यांच्यात कोणत्याही जादूई क्षमता नाहीत) असलेल्यांना येथे प्रवेश मिळत नाही. हॉगवॉर्ट्‌जमधील चमत्कारी लेखणी ज्या कुठल्या जादूई क्षमता असणाऱ्या मुलाचा जन्म शोधते आणि त्यांची नावं एका मोठ्या चर्मपत्रांच्या वहीत लिहून ठेवते. मात्र इथे कोणतीही प्रवेशपरीक्षा नसते, कारण 'एकतर तुम्ही जादूई आहात किंवा नाही' हीच प्रवेशाकरताची अट आहे. दरवर्षी शिक्षक ही वही तपासतात आणि जी मुले अकरा वर्षांची झाली असतात त्यांना पत्र पाठवतात.