हैदराबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी)
हैद्राबाद मुक्तीसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ आहे. यांचे संपादन डॉ. प्रभाकर देव यांनी केले आहे. हा ग्रंथ १९९९ साली प्रकाशित करण्यात आला.
या ग्रंथाची एकूण पृष्ठे ४९६ असून ३५० रुपये किंमत आहे.
विद्यापीठाच्या हैद्राबाद मुक्तिसंग्राम संशोधन साधन प्रकल्प अंतर्गत हा ग्रंथ संपादित करण्यात आला आहे. गोविंदभाई श्रॉफ, जनार्दन वाघमारे आणि गो. रा. म्हैसेकर या प्रकल्पाचे सल्लागार होते.
ग्रंथामध्ये खालील स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रत्यक्ष मुलाखती आहेत.
गंगाप्रसादजी अग्रवाल, रामकृष्ण अनादुरकर, विजयेंद्र काबरा, देवराव कांबळे, खंडेराव कुलकर्णी, भुजंगराव कुलकर्णी, ए. मा. कुलकर्णी, श्रीधरराव कुलकर्णी, बाबुराव कुंटूरकर, पुरुषोत्तम चपळगावकर, करुणा चौधरी, देवीसिंह चौहान, बाबुराव जाधव, रतिलाल जरीवाला, काशिनाथराव जोशी, सुनंदा जोशी, बेळूर्गीकर, आण्णाराव टाकलगव्हाणकर, माणिकराव टाकलगव्हाणकर, अनंतराव नागापूरकर, माधवराव नांदेडकर, ताराबाई परांजपे, सीताराम पप्पू, भीमराव पिंगळे, साहेबराव बारडकर, वैद्य तात्यासाहेब महाजन, विमलाबाई मेलकोटे, गो. रा. म्हैसेकर, दत्तुगीर तोंडचीरकर, गंगुबाई देव, आर डी देशपांडे, दत्तोपंत देशापांडे जाफराबादकर, गो. बा. देशमुख, भगवानराव देशमुख, विष्णूपंत देशमुख, अमृतराव देशमुख, कुसुमाकर देसाई, वि. पा. देऊळगावकर, विठ्ठलराव रत्नाळीकर, रघुनाथराव रांजणीकर, पद्माकर लाठकर, नारायणराव लोहारेकर, सुमित्रादेवी वाघमारे, चंद्रशेखर वाजपेयी, प्रभाकर वाईकर, प्रतिभा वैश्न्पायन, भालचंद्र व्याहालकर, किशोर शहाणे, दगडाबाई शेळके, गोविंदभाई श्रॉफ, यशवंतराव सायगावकर, विश्वंभरराव हराळकर, शंकरराव चव्हाण, ग्रंथाच्या आरंभी गोविंदभाई श्रॉफ, जनार्दन वाघमारे, प्रभाकर देव यांचे मनोगत असून शेवटी चार परीशिष्ट्ये दिली आहेत.