हैती राष्ट्रीय फुटबॉल संघ
हैती फुटबॉल संघ (फ्रेंच: Équipe Haïtienne de football, हैतीयन क्रियोल: Ekip foutbòl nasyonal Ayiti; फिफा संकेत: HAI) हा कॅरिबियनमधील हैती देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला हैती सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ७९ व्या स्थानावर आहे. हैतीने आजवर १९७४ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. तसेच हैती ११ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याने १९७३ साली अजिंक्यपद मिळवले होते.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-09-28 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत