हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट)
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज, भाग १ | |
---|---|
दिग्दर्शन | डेवीड येट्स |
निर्मिती | डेवीड हेमॅन डेवीड बॅरॉन |
कथा | जे.के. रोलिंग |
पटकथा | स्टीव क्लोव्हस |
प्रमुख कलाकार | डॅनियेल रॅडक्लिफ एम्मा वॉटसन रूपर्ट ग्रिंट |
देश | युनायटेड किंग्डम अमेरीका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | ११ नोव्हेंबर २०१० |
वितरक | वॉर्नर ब्रर्दस पिक्चर्स |
अवधी | १६१ मिनीटे |
निर्मिती खर्च | $२५ कोटी भाग २चा खर्च मिळून. |
एकूण उत्पन्न | $९६.०३ कोटी. |
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हा हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवा चित्रपट आहे जो चित्रपट १९ नोव्हेंबर २०१०ला प्रदर्शित झाला.[१] ह्या चित्रपटचे डेवीड येट्स ने दिग्दर्शन केले व वॉर्नर ब्रर्दस पिक्चर्सने वितरण केले. हा चित्रपट जे.के. रोलिंगच्या हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज पुस्तकावर आधारीत आहे.
ह्या चित्रपटातील प्रमुख कलाकार हॅरी पॉटरच्या भुमिकेत डॅनियेल रॅडक्लिफ व हॅरीचे सर्वोत्तम मित्र म्हणुन हरमायनी ग्रेंजरच्या भुमिकेत एम्मा वॉटसन आणि रॉन विजलीच्या भुमिकेत रूपर्ट ग्रिंट आहेत. हा चित्रपट हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिन्स चित्रपटानंतरचा भाग आहे व ह्या चित्रपटानंतरचा भाग हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २ जो या मालिकेतील शेवटचा चित्रपट आहे.
ह्या चित्रपटात हॅरी, रॉन आणि हरमायनी हे तिघे, त्यांना डंबलेडोरने दिलेले मिशन पूर्ण करण्यासाठी निघतात, ज्या मध्ये त्यांना व्होल्डेमॉर्टच्या हॉक्र्स्जचा शोध करुण नाश करावयाचा असतो. ज्यामुळे लॉर्ड व्हॉल्डेमॉर्टचा नाश करता येईल. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी १९, २००९ रोजी सुरू झाले व जून १२, २०१० रोजी चित्रीकरण संपले. नोव्हेंबर १९, २०१० रोजी हा चित्रपट आयमॅक्स व इतर चित्रपटांच्या प्रकारात प्रदर्शित झाला[१].
ह्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकुन $३३ कोटी डॉलर उत्पन्न कमवले, ज्यामुळे हा चित्रपट हॅरी पॉटर चित्रपटांच्या उत्पन्न यादीत तिसऱ्या स्थानावर आला. २०१० वर्षातील प्रदर्शित चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट पहिल्या स्थानावर आला, आणि आज पर्यंत प्रदर्शित चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या यादीत हा चित्रपट ८व्या स्थानावर आला.[२] एकूण ह्या चित्रपटाने $९६.०३ कोटी उत्पन्न कमवले ज्यामुळे २०१० वर्षातील प्रदर्शित सर्व चित्रपटांच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आला. टॉय स्टोरी ३ पहिल्या स्थानावर आणि एलीस इन वॉन्डरलॅन्ड दुसऱ्या स्थानावर होते[२]. सर्व हॅरी पॉटर चित्रपटांच्या उत्पन्न यादीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आला, पहिल्या स्थानावर हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २ व दुसऱ्या स्थानावर हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन चित्रपट होते[३]. आज पर्यंत सर्वात जास्त उत्पन्न कमवनाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट ३७व्या स्थानावर आला[४].
ह्या चित्रपटाला ८३वे ऑस्कर पुरस्कार मध्ये दोन नामांकने प्राप्त झाली, बेस्ट व्हिजुअल एफेक्ट्स (सर्वोत्तम चित्र प्रभाव) आणि बेस्ट आर्ट डारेक्शन (सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन)
कथानक
जादुई मंत्रालय (मिनीसट्री ऑफ मॅजीक)चे मंत्री, रुफस स्क्रिमगेउर जोर हे नेत्यांना संबोधित करत असतात, ज्यात ते म्हणतात की लॉर्ड व्हॉल्डेमॉर्टने किती ही ताकद मिळवली, तरी सुद्धा जादुई मंत्रालय प्रबळ राहील. पुढे डंबलडोरची मृत्यु झाल्यानंतर प्राणभक्षीनी त्यांच्या वाईट कामाच्या प्रमाणात खुप मोठी वाढ केली आहे, व मगलू सामूहिक हत्याकांडा सोबत मंत्रिमंडळात घुसखोरी करत असतात. हॅरी, रॉन आणि हरमायनी हे तिघे, त्यांना डंबलेडोरने दिलेले मिशन पूर्ण करण्यासाठी निघतात, ज्या मध्ये त्यांना व्होल्डेमॉर्टच्या हॉक्र्स्जचा शोध करुण नाश करावयाचा असतो. दरम्यान, सिव्हीरस स्नेप, लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट आणि प्राणभक्षीना सांगतो की हॅरी त्याच्या प्रिवेट ड्राइव्ह येथिल घरात आहे व हॉगवर्ट्सला गेलेला नाही आहे. हे एकुन, व्होल्डेमॉर्ट, लूसियस मॅल्फॉयची जादुई छडी हॅरीची हत्या करण्यासाठी घेतो, कारण हॅरीच्या जादुई छडीची शक्ती त्याची जादुई छडीच्या समान असते, ज्यामुळे त्याला स्वतःच्या जादुई छडी वापरून हॅरीची हत्या करण्यात अपयश येत असतो..
पुढे ऑर्डर ऑफ फिनिक्स एकत्रित येउन हॅरीला सुरक्षित पद्धतीने हॉगवर्ट्सला पोहचवण्यासाठी योजना बनवतात, ज्यात ते वेषांतर काढाचा वापर करून हॅरीचे रूप बदलून व सर्वाना विविध दिशेने यात्रा करावायचे ठरते, ज्यामुळे व्होल्डेमॉर्ट व त्याच्या साथिदार गोंधळुन जातील. पुढे हॅरीला नेताना सर्वजणावर प्राणभक्षी हल्ला करतात, ज्या मध्ये मॅड-आय मूडी आणि हेडविग मारले जातात व जॉर्ज विजली आणि हॅग्रिड जखमी होतात. सुरक्षित स्थानावर (बरो) हॅरीला पोहचवल्यावर, हॅरीला एक दृष्टी होते, ज्यात त्याला दिसते की व्होल्डेमॉर्ट, जादुई छड्यांची निर्मीती करणाऱ्या ओलीवंडरचा छळ करतो आहे. दुसऱ्या दिवशी रुफस स्क्रिमगेउर बरोला आल्बस डंबलडोरचे वारसपत्र घेउन येतो, ज्या मध्ये तो रॉन, हरमायनी, आणि हॅरी मध्ये तिन गोष्टींचे वितरण करतो. रॉनला आल्बस डंबलडोरचे डिलुमिनेटर मिळते, हरमायनीला "द टेल्स ऑफ बीडल द बार्ड" पुस्तकाची एक प्रत मिळते, हॅरीला त्याने खेळेल्या सर्वात पहिल्या क्विडिच सामन्यात पकडलेले सोनेरी स्निच मिळते. रुफस स्क्रिमगेउर हॅरीला सांगतो की त्याला वारसामध्ये गॉड्रीक ग्रिफिंडोरची तलवार सुद्दा मिळाली आहे, पण ती वारसामध्ये देण्यासाठी डंबलडोरची कधीच नव्हती व सद्ध्या ती हरवलेली आहे.
पुढे प्राणभक्षी रुफस स्क्रिमगेउरची हत्या करतात आणि त्याच्या जागी पायस थाइकनेसला नेमतात. जादुई मंत्रालय मगल जन्माचे सर्व जादूगाराना अटक करून, छळ करायला सुरुवात करतात. बिल विजली आणि फ्लेर डेलॅकोअरच्या लग्नामध्ये, हॅरी पॉटर आणि जिनी विजली, चुंबन घेत असतात जेव्हा जिनी भाऊ त्यांच्यामध्ये व्यत्यय पाडतो. पुढे लगनाच्यावेळेत प्राणभक्षी हल्ला करतात. पण किंग्सले शैक्लेबोल्टच्या पितृदेव मंत्र जादुमुळे (प्राणभक्षी मात देण्याची जादु), बहुतेक लोक तेथुन पलायन करतात. हॅरी, हरमायनी आणि रॉन सुद्दा जादुचा वापर करून लंडनला पलायन करतात जेथे एका उपहारगृहमध्ये प्राणभक्षी त्यांच्यावर पुन्हा हल्ला करतात, ज्यामुळे त्यांना १२ ग्रिमलॉल्ड प्लेस येथे आश्रय घ्यावा लागतो. तेथे त्यांना कळते की "आर.ए.बि" कोरलेले जे बनावट हॉर्क्राक्स लॉकेट त्यांच्याकडे आहे ते तर सिरीयस ब्लॅकचा धाकटा भाऊ रेगुलस आर्क्टुरस ब्लॅक याचा आहे. ब्लॅकच्या घरात काम करणारा क्रिचर (बुटका गुलाम) त्यानां सांगतो की मुंडुंगस फ्लेचरने घर फोडी करून खरा लॉकेटसह घरातून अनेक गोष्टी चोरल्या. पुढे क्रिचर आणि डॉबी फ्लेचरला पकडतात व फ्लेचर त्यांना सांगतो की खरा लॉकेट डेलॉर्स उंब्रिजच्या ताब्यात आहे. वेषांतर काढा वापर करून हॅरी, रॉन आणि हरमायनी मंत्रालयामध्ये घुसतात व त्यांना लोकेट डेलॉर्स उंब्रिजच्या गळ्याभोवती सापडतो. हॅरीने उंब्रिजला जादुच्या मदतीने बेशुध करतो व हरमायनी लॉकेट मिळवते. तेथुन पळताना त्यांचा बराच पाठलाग होतो, व ते जादुने पुन्हा जंगलात येतात, या सर्व पळापळीत रॉन जखमी होतो व त्यामुळे त्याला बरे होईपर्यंत जादु वापरता येत नाही.
पुढे हॅरी, रॉन आणि हरमायनी तो लॉकेट, जो हॉर्क्राक्स असतो, त्याचा नाश करण्यासाठी अनेक अयशस्वी प्रयत्न करतात, शेवटी त्या लॉकेटची शक्ती कमी करण्यासाठी ते लॉकेट गळ्यात घालुन ठेवतात. पुढे हॅरीला पुन्हा एक दृष्टी होते, ज्यात त्याला दिसते की व्होल्डेमॉर्ट, जादुई छड्यांची निर्मीती करणाऱ्या ग्रेगोरोविचचा छळ करत हत्या करतो. मरण्यापुर्वी ग्रेगोरोविच व्होल्डेमॉर्टला कबुली देतो की एक किशोरवयीन मुलाने एकदा त्याच्या दुकानातून सुप्रसिद्ध अजिंक्य छडी चोरी केली होती. पुढे रॉनच्या गळ्यात लॉकेट असल्यामुळे, त्याला नकारात्मक भावना येण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तो हरमायनी आणि हॅरीबरोबर भांडतो व त्या दोघांना सोडुन जातो. पुढे हरमायनी असे वाटते की ग्र्रीफिंडरची तलवार हॉर्क्राक्सस नष्ट करू शकते, ज्यामुळे दोघे गॉडरिक्स हॉलोला जाण्याचा निर्णय घेतात. तेथे गेल्यावर, दोघे हॅरीच्या पालकांना दफन केलेल्या जागी व ठार केलेल्या घरात भेट देतात. तेथे त्यांची भेट बठील्डा बॅग्शॉट सोबत होते, व त्यांना विश्वास होतो की गॉड्रीक ग्रिफिंडोरची तलवार बठील्डा कडे असेल. मग बठील्डा, हॅरी आणि हरमायनीला तीच्या घरी नेते, तेथे त्यांना कळते की बठील्डाला, व्होल्डेमॉर्टच्या अजगर नगिनीने कधीच ठार मारले आहे, व नगिनी जादुचा वापरून बठील्डाच्या शरीराचा वापर करत होती आणि इतक्या वेळेपासुन ते बठील्डा नाही पण नगिनी सोबत बोलत होते. पुढे हॅरी आणि हरमायनी तेथुन पलायन करताना, नागिनी सोबत संघर्ष करतात, ज्यामध्ये हरमायनी हॅरीची जादुई छडी चुकुन मोडते. दोघांना तेथुन पलायन करण्यास यश मिळते वे ते जादुचा वापर करून फॉरेस्ट ऑफ डिन येथे आश्रय घेतात. नंतर हरमायनीला हॅरीच्या दृष्टीमध्ये दिसलेला रहस्यमय चोर (ज्याने अजिंक्य छडी चोरली होती) ओळखण्यास यश येते, ती त्या चोराला गेलर्ट ग्रिंडेलवाल्ड म्हणुन ओळखते.
त्या दिवशी संध्याकाळी हॅरीला एका हरिणच्या रूपात पितृदेव दिसतो, जो त्याला एका गोठलेल्या तालावकडे नेतो. हॅरीला त्या तलावाच्या तळाशी गॉड्रीक ग्रिफिंडोरची तलवार दिसते, जीला परत मिळविण्यासाठी हॅरी पाण्यात उतरतो. त्याच्या गळ्यातल्या लॉकेट (जो हॉर्क्राक्स असतो) त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो परंतु रॉन वेळेत येउन त्याची सुटका करतो. मग हॅरी लॉकेट उघडण्यासाठी सर्पभाषी भाषेचा वापर करतो आणि रॉन त्या हॉर्क्राक्सला तलवारीने नष्ट करतो. पुढे हरमायनी आणि रॉन आपसातील मत भेद विसरतात आणि तिघे निर्णय घेतात की क्झेनोफिलीयस लव्हगुडला भेटुन, आल्बस डंबलडोरचे ने हरमायनीला दिलेल्या पुस्तकातील चिन्हाबद्दल अधिक जाणून घ्यावे. क्झेनोफिलीयस लव्हगुड त्यांना स्पष्ट करतो की तो चिन्ह मृत्य देवता दर्शवते ज्यामते जेव्हा एखादा जादुगर त्या तीन जादूई वस्तू एकत्रित करतो तर तो अत्यंत शक्तीशाली जादुगर बनतो, व तो मृत्यूचा राजा बनतो. हरमायनी आपल्या पुस्तकातील मृत्यूदेवतेच्या भेटी कथा वाचते. मग ते तीघे निघण्यास दरवाज्याकडे जातात, तेव्हा त्यांना क्झेनोफिलीयस लव्हगुड अडवतो. तो त्यांना सांगतो की प्राणभक्षी त्याची मुलगी लुना लव्हगुडचे अपहरण केलेले आहे, व त्यांनी प्राणभक्षीना संदेश पाठवला आहे की हॅरी त्याच्या सोबत आहे. हॅरी, रॉन आणि हरमायनी जादुचा वापर करून तेथुन पळ काढतात. प्राणभक्षी तेथे येऊन क्झेनोफिलीयस लव्हगुडचे घर नष्ट करतात.
पुढे हॅरी, रॉन आणि हरमायनी एका जंगलात आश्रय घेतात व तेथे तात्पुरती राहण्याची सोय करतात. तेथे स्नॅच्रस येउन त्यांना ताब्यात घेतात व त्या तिघांना मॅल्फॉयच्या घेरी नेतात. हॅरीला पकडण्याआधी काही क्षणा आधी, हरमायनी जादुचा वापर करून हॅरीचा चेहरा बदलते. मग मॅल्फॉयच्या घेरी बेलॅट्रिक्स लेस्ट्रेंज हॅरी आणि रॉनला लुना लव्हगुड, ओलीवँडर आणि ग्रिपहुक सोबत तुरुंगात टाकते. बेलॅट्रिक्स नंतर गॉड्रीक ग्रिफिंडोरची तलवार कशी मिळाली याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हरमायनीवर अत्याचार करते, कारण ती तलवार तीच्या ताब्यात होती, व तिने ती ग्रिंगॉटच्या तिजोरीत ठेवलेली होती. मग हॅरी मदतीसाठी डॉबीला एक तुटलेल्या आरसाच्या मदतीने संदेश पाठवतो. डॉबी त्यांना वाचवण्यासाठीच्या तळघरा मध्ये प्रकट होतो व हॅरी आणि रॉन हरमायनी वाचविण्यासाठी धावतात. हरमायनीला वाचविण्याच्या प्रयत्नात लढाई सुरू होते ज्या मध्ये हॅरी ड्रॅको मॅलफॉयला निःशस्त्र करतो, डॉबी बेलॅट्रिक्स लेस्ट्रेंजच्या अंगावर एक झूंबर पाडुण तिला हरमायनी सोडण्यासाठी भाग पाडतो. जेव्हा डॉबी सर्वांना पकडुन जादुने पलायन करणार असतो, त्या शेवटच्या क्षणी बेलॅट्रिक्स एक चाकू त्यांच्या दिशेने फेकते.
मग ते सर्व शेल कॉटेजवर पोहचतात आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येते की बेलॅट्रिक्सने फेकलेल्या चाकूने डॉबी गंभीररित्या जखमी झाला आहे. डॉबी हॅरीच्या हातावर मरण पावतो. हॅरी आग्रह करतो की डॉबीला कोणत्याही जादूशिवाय दफन करायचे. या आग्रहवर सर्वजन सहमत होतात.
अंतिम दृश्यात, व्होल्डेमॉर्ट डंबलडोरची समाधी मोडतो आणि अजिंक्य छडी चोरतो.
पात्र
- हॅरी पॉटरच्या भुमिकेत डॅनियेल रॅडक्लिफ
- हरमायनी ग्रेंजरच्या भुमिकेत एम्मा वॉटसन
- रॉन विजलीच्या भुमिकेत रूपर्ट ग्रिंट
- बेलॅट्रिक्स लेस्ट्रेंजच्या भुमिकेत हेलेना बोनहम कार्टर
- रुबियस हॅग्रिडच्या भुमिकेत बिल नायघी
- सेव्हेरस स्नेपच्या भुमिकेत ॲलन रिकमन
- लूसियस मॅल्फॉयच्या भुमिकेत जेसन आयझॅक्स
- मॅड-आय मूडीच्या भुमिकेत ब्रेंडन ग्लिसन
- जॉर्ज विजलीच्या भुमिकेत ऑलिव्हर फेल्प्स
- रुबियस हॅग्रिडच्या भुमिकेत रोबी कोल्ट्रेन
- ओलीवंडरच्या भुमिकेत
- पायस थाइकनेसच्या भुमिकेत
- फ्लेर डेलॅकोअरच्या भुमिकेत
- किंग्सले शैक्लेबोल्टच्या भुमिकेत
- सिरियस ब्लॅकच्या भुमिकेत
- रेगुलस आर्क्टुरस ब्लॅकच्या भुमिकेत
- मुंडुंगस फ्लेचरच्या भुमिकेत
- डेलॉरीस उंब्रिजच्या भुमिकेत
- ग्रेगोरोविचच्या भुमिकेत
- बठील्डा बॅग्शॉटच्या भुमिकेत
- गेलर्ट ग्रिंडेलवाल्डच्या भुमिकेत
- क्झेनोफिलीयस लव्हगुडच्या भुमिकेत
- लुना लव्हगुडच्या भुमिकेत
- ग्रिपहुकच्या भुमिकेत
पुस्तके
- हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन
- हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
- हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान
- हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर
- हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स
- हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिन्स
- हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज
चित्रपट
- हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन
- हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
- हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान
- हॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स
- हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर
- हॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स
- हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ a b "हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १ची प्रदर्शन तारीख जाहिर". 2008-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-15 रोजी पाहिले. Unknown parameter
|ऍक्सेसदिनांक=
ignored (सहाय्य) - ^ a b "जागतिक स्तरावर प्रदर्शित चित्रपट".
- ^ "हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १ सर्व हॅरी पॉटर चित्रपटांच्या उत्पन्न यादीत तिसऱ्या स्थानावर".
- ^ "बॉक्स ऑफीस मध्ये कमाई करणारे सर्व चित्रपट".