Jump to content

हृदयनाथ मंगेशकर

हृदयनाथ मंगेशकर

हृदयनाथ मंगेशकर
आयुष्य
जन्म ऑक्टोबर २६, १९३७
पारिवारिक माहिती
अपत्ये आदिनाथ मंगेशकर
राधा मंगेशकर
वैजनाथ मंगेशकर
संगीत साधना
गायन प्रकार कंठसंगीत गायन, संगीतकार
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन, सुगम संगीत
कारकिर्दीचा काळ १९५५ पासून
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (२००९)

हृदयनाथ मंगेशकर (ऑक्टोबर २६, १९३७ - हयात) हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत.

कारकीर्द

त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्‌गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत.

त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात.

गाजलेली गीते

शीर्षक गायक/गायिका गीतकार चित्रपट
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्यालता मंगेशकरसुरेश भटउंबरठा
चांदण्यात फिरतानाआशा भोसलेसुरेश भट
मालवून टाक दीपलता मंगेशकरसुरेश भट
सूर मागू तुला मी कसा?अरुण दातेसुरेश भट
तुज मागतो मी आतालता मंगेशकररामकृष्ण बाबू सोमयाजी
भय इथले संपत नाहीलता मंगेशकरग्रेस
सावर रेलता मंगेशकरमंगेश पाडगावकर
दे मला गे चंद्रिकेलता मंगेशकरराजा बढे
रातिची झोप मज येईनालता मंगेशकरशांता शेळकेपवनाकाठचा धोंडी
त्या फुलांच्या गंधकोषीहृदयनाथ मंगेशकरसूर्यकांत खांडेकर
ॐ नमोजी आद्यालता मंगेशकरसंत ज्ञानेश्वर
तिन्हीसांजा सखे मिळाल्यालता मंगेशकरभा.रा.तांबे
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजालता मंगेशकरस्वातंत्र्यवीर सावरकर
जिवलगा, राहिले दूर घर माझेआशा भोसलेशांता शेळके
सागरा प्राण तळमळलाहृदयनाथ, मीना, उषा आणि लता मंगेशकरस्वातंत्र्यवीर सावरकर
हासायाचे, आहे मलालता मंगेशकरआरती प्रभु
जाईन विचारित रानफुलाकिशोरी अमोणकरशांता शेळके
वादलवारं सुटलं गोलता मंगेशकरशांता शेळके
नीज रे नीज शिवरायालता मंगेशकरराम गणेश गडकरी
कशी काळनागिणीलता मंगेशकरभा.रा.तांबे
नाहि कशी म्हणू तुलालता मंगेशकरचिंतामणी त्र्यंबक खानोलकर
वेडांत मराठे वीर दौडले सातलता मंगेशकरवि.वा. शिरवाडकरशिवकल्याणराजा
ती येते आणिक जातेमहेंद्र कपूरचिंतामणी त्र्यंबक खानोलकर
हे श्यामसुंदर राजसाकिशोरी आमोणकरशांता शेळके

पुरस्कार

  • २००९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
  • पुणे नवरात्र महोत्सवातर्फे दिला गेलेला ’महर्षी पुरस्कार" (२०१४)
  • पुणे-चिंचवड येथील नादब्रह्म परिवारातर्फे नादस्वरब्रह्मश्री पुरस्कार (७ जानेवारी २०१७)
  • पुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार (९ ऒक्टोबर २०१७)
  • २०१८ सालचा मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१६ मार्च २०१८)

बाह्य दुवे