Jump to content

हूनान

हूनान
湖南省
चीनचा प्रांत

हूनानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हूनानचे चीन देशामधील स्थान
देशFlag of the People's Republic of China चीन
राजधानीछांग्षा
क्षेत्रफळ२,१०,००० चौ. किमी (८१,००० चौ. मैल)
लोकसंख्या६,६४,४४,८६४
घनता३२० /चौ. किमी (८३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CN-HN
संकेतस्थळhttp://www.enghunan.gov.cn/

हूनान (चिनी लिपी: 湖南 ; फीनयिन: Húnán) हा चीन देशाच्या मध्य-दक्षिण भागातील एक प्रांत आहे. यांगत्सेच्या भोऱ्याच्या मध्यभागात स्थित असलेल्या ह्या प्रांताच्या उत्तरेला हुबेई, पूर्वेला च्यांग्शी, दक्षिणेला क्वांगतोंगक्वांग्शी, पश्चिमेला क्वीचौ तर वायव्येला चोंगछिंग हे राजकीय विभाग आहेत. छांग्षा ही हूनानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०२० साली सुमारे ६.६४ कोटी लोकसंख्या असलेला हूनान चीनमधील सातव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत आहे. आधुनिक चीनचा जनक माओ त्झ-तोंग ह्याचे जन्मस्थान हूनान प्रांतामध्येच आहे.

राजकीय विभाग

हूनान प्रांत ९ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.

हूनानचे राजकीय विभाग
झूचौ
श्यांग्तान
हेंगयांग
शाओयांग
युयांग
झांगजियाजी
यीयांग
चेनचौ
योंगचौ
ह्वाऐव्हा
लौदी
श्यांग्शी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत