Jump to content

हुरडा

हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. ज्वारीचे कणीस लागल्यावर परागीकरण झाल्यावर साधारण 3०ते 4० दिवसातील दाणे कोवळे समजले जातात. हे दाणे रंगाने हिरवे असतात तर आकाराने तयार ज्वारी दान्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसदार असतात. ज्वारीचे कणीस निखार्यावर किंवा शेकोटीत भाजून एकेक कणीस पोत्यावर चोळून हे दाणे कणसापासून वेगळे केले जातात. ते गरम गरम खाणे अपेक्षित असते. गार झाल्यावर हे दाणे कडक होतात. असे सगळ्यांनी एकत्र कोवळे दाणे खाण्याला हुरडा पार्टी म्हणतात. त्या पार्टीत हुरडा मुख्य असतो. त्याशिवाय वांगे भाजी भाकरी दही असा मेनू असतो. हे जेवणातले पदार्थ भागा प्रमाणे बदलतात. सिहगड परिसरात त्यासोबत दही देण्याची पद्धत आहे.