Jump to content

हुमायून अब्दुलअली

हुमायून अब्दुलअली

हुमायून अब्दुलअली यांचे चित्र
जन्ममे १९, १९१४
कोबे, जपान
मृत्यूजून ३, २००१
मुंबई, भारत
नागरिकत्वभारत
धर्मइस्लाम (सुलेमानी बोहरा)
कार्यक्षेत्रनिसर्गवादी, पक्षिविद्यातज्‍ज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ता, वर्गीकरणशास्त्रज्ञ
कार्यसंस्थाबॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
प्रशिक्षणसेंट झेवियर्स कॉलेज
पुरस्कारमहाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार (१९९८)
वडीलनजमुद्दीन फैझलहुसेन अब्दुलअली
आईलुलू
पत्नीरफिया तय्यअजी
अपत्येअकबर अब्दुलअली, सलमान अब्दुलअली

हुमायून अब्दुलअली (मे १९, १९१४, कोबे, जपान - जून ३, २००१, मुंबई, भारत)[] भारतीय निसर्गवादी, पक्षिविद्यातज्‍ज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ते आणि वर्गीकरणशास्त्रज्ञ होते. भारताचे "पक्षिपुरुष" म्हणून ओळखले जाणारे पक्षिविद्यातज्ज्ञ सलीम अली यांचे ते चुलत भाऊ होते. त्या काळच्या इतर निसर्गतज्ज्ञांप्रमाणे त्यांनाही सुरुवातीला शिकारीत रस होता. त्यांचे मुख्य योगदान पक्षी संग्रहांवर आधारित होते, विशेषतः बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये जिथे त्यांच्या आयुष्यातील बहुतांश काम केले.

प्रारंभिक वर्षे आणि शिक्षण

हुमायूं अब्दुलली यांचा जन्म १९१४ साली कोबेमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव लुलु होते आणि वडिलांचे नाव नजमुद्दीन फैझलहुसेन अब्दुलअली होते. त्यांचे वडील भारतातून कच्चा कापूस आणि काडेपेट्या आयात करणारे व्यापारी होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ [१] मृत्युलेख, जे. सी. डॅनियल, (2003), जर्नल ऑफ द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, 100 (2 & 3): 614 १०० (२ आणि ३): ६१४ (इंग्लिश मजकूर)