हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
17317 / 17318 हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते हुबळीदरम्यान चालणारी एक प्रवासी सेवा आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे चालवण्यात येणारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस व हुबळी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मुंबई→पनवेल→कर्जत→पुणे→मिरज→बेळगाव→लोंढा→हुबळी ह्या मार्गावरून जाते व ७२८ किमी अंतर सुमारे १५ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करते.
थांबे
ही गाडी खालील स्थानकांवर थांबते
- हुबळी
- धारवाड
- अलनावर
- लोंढा
- बेळगाव
- घटप्रभा
- रायबाग
- कुडची
- मिरज
- सांगली
- कराड
- सातारा
- पुणे
- लोणावळा
- पनवेल
- ठाणे
- लोकमान्य टिळक टर्मिनस