हुपरी
हुपरी हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील छोटे शहर आहे. हे गाव चांदी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गावाला चंदेरीनगरी म्हणून देखील ओळखले जाते. हुपरी येथे नगरपरिषद आहे.नगरपरिषद होण्यासाठी हुपरीच्या नागरिकांनी लोकलढा उभारला होता. नगरपालिका कृती समितीची स्थापना केली होती.अमजद नदाफ हें त्या समितीचे निमंत्रक होते. तिच्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेतला होता.