हुंडी
हुंडी हा भारतातील पैशाच्या देवाणघेवाणीसाठी वापरला जाणारा एक पुरातन व्यवहार आहे. हुंडीला आधुनिक भाषेत बिल ऑफ एक्सचेंज असे नाव आहे. मध्ययुगीन कालखंडात या संकल्पनेचा व्यवहारासाठी उपयोग केला जात होता.
उदाहरण
एक मनुष्य पुण्याहून दिल्ली येथे जाणार आहे. तो माणूस स्वतःबरोबर रोख रक्कम ठेवण्याऐवजी पुण्यातील सावकाराकडे आपली रक्कम ठेवायचा. त्या बदल्यात पुण्यातील सावकार त्यास दिल्लीतील एका सावकाराच्या नावाने हुंडी लिहून द्यायचा. ही हुंडी दिल्लीतील सावकारास दाखवली का दिल्लीतील सावकार त्या बदल्यात रोख रक्कम हाती द्यायचा. या हुंडीबद्दल काही शुल्क वसूल केले जायचे. जेव्हा दिल्लीतील कुणाला पुण्यासाठी हुंडी हवी असेल तेव्हा हाच व्यवहार उलट पद्धतीने व्हायचा.