हिवर
हे भारतात उगवणारे एक झाड आहे. हिवराचे शास्त्रीय नाव आहे - Vachellia leucophloea.
हिवराचे झाड प्रामुख्याने मध्य व दक्षिण भारतात आढळते. हे झाड २०-३० फूट उंच वाढते. त्याचा घेर दोन ते तीन फूट असू शकतो.
देवदानवांच्या युद्धात लोहसर-खांडगाव पासून उत्तरेला तीन किलोमीटर अंतरावर राहूचे शिर पडले, असे सांगितले जाते. ते शिर हिवराच्या झाडाखाली पडले त्यावरून गावाचे नाव राहु हिवरे (आजचे राघोहिवरे) असे पडले.