हिलरी फर्नांडीस
फादर हिलरी फर्नांडीस (२२ ऑक्टोबर, इ.स. १९३८; वसई, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे मराठीभाषिक कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. ते नावाजलेले लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, कीर्तनकार व विचारवंत ही आहेत. सध्या ते उत्तन, भायंदर येथील मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचे संचालक आहेत.
जीवन
हिलरी फर्नांडीस यांचा जन्म २२ ऑक्टोबर , इ.स. १९३८ रोजी वसई तालुक्यातल्या रमेदी येथील तर्खड गावी झाला. त्यांचे शिक्षण रमेदी येथील प्राथमिक शाळेत आणि पापडी येथील हायस्कुलात झाले. इ.स. १९७० साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांची प्रथम नेमनुक ही निर्मल धर्मग्राम येथे झाली.
प्रकाशित साहित्य:=
- कीर्तनामृत (१९६९)
- नवे गीत गा (१९७३)
- मला गाऊ दे गीत (१९७९)
- होता कशास तुम्ही निराश ()
- फडके हे निशाण शांतीचे ()
- प्रेमाचा महामंत्र ()
- वाद,विवाद प्रतिवाद ()
- तोच जगी या सुखी ()
- गीत बायबल ()