Jump to content

हिरोहितो

हिरोहितो / सम्राट शोवा
裕仁 / 昭和天皇
जपानचा सम्राट
अधिकारकाळडिसेंबर २५, इ.स. १९२६ ते जानेवारी ७, इ.स. १९८९
राज्याभिषेकनोव्हेंबर १०, इ.स. १९२८
जन्मएप्रिल २९, इ.स. १९०१
ओयामा राजवाडा, तोक्यो, जपान
मृत्यूजानेवारी ७, इ.स. १९८९
फुकिआज राजवाडा, तोक्यो, जपान
पूर्वाधिकारीसम्राट तायशो
उत्तराधिकारीअकिहितो
वडीलसम्राट तायशो
आईसम्राज्ञी तेयमे
पत्नीसम्राज्ञी कोजुन
संततीराजकुमारी तेरू
राजकुमारी हिसा
राजकुमारी ताका
राजकुमारी योरी
सम्राट अकिहितो
राजकुमार हिताची
राजकुमारी सुगा

इचितोमिया हिरोहितो (१९०१ १९८९) जपानच्या पुनरुत्थानासाठी अथक परिश्रम घेणारे सम्राट होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, देश बेचिराख झाला तरीही प्राप्त परिस्थितीस सामोरे जाणारे सम्राट हिरोहितो हे आधुनिक जपानचे निर्माते होत.

हिरोहितो यांचे शिक्षण राजकुमारांच्या खास शाळेत झाले. राजकुमारासाठी आवश्यक सर्व शिक्षण त्यांनी घेतले, ते योद्धा बनले पण मनाने ते तत्त्वज्ञ व विचारवंत होते.

जपानी राजकुमारांची परंपरा मोडून हिरोहितो यांनी नागाकोवुनी या युवतीशी प्रेमविवाह केला. हिरोहितो यांनी सम्राट पद घेतले तेव्हा जपान अशांत होता, राजकीय खून, मारामाऱ्या यांना ऊत आलेला होता. हिरोहितो यांना शोवा हे नाव धारण केले. याचा अर्थ ज्ञानपिपासू, शांतता असा होतो. शांतताप्रेमी लोकांनाही आपल्या सम्राटाच्या शांततेच्या मार्गावर विश्वास होता.

दुसऱ्या महायुद्धात जपानचा परभव झाला. सम्राट हिरोहितो यांनी २६ शतकांची परंपरा मोडून थेट सामान्य माणसाशी संवाद साधला, जनतेला उद्देशून सार्वजनिक भाषण केले. या भाषणात त्यांनी कुठेही पराभवाचा, शरणागतीचा उल्लेख केला नाही. जपानची लष्करी महासत्ता अशी ओळख पुसून लोकशाही पद्धतीने, सगळ्यांच्या सहभागाने देश पुढे नेण्यास मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे जपानचा विकास आरखडाही तयार करण्यात आला.