हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | धरमशाला |
स्थापना | २००३ |
आसनक्षमता | २३,००० |
मालक | हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटन |
प्रचालक | हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटन |
यजमान | भारतीय क्रिकेट संघ हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ किंग्स XI पंजाब |
प्रथम ए.सा. | २७ जानेवारी २०१३: भारत वि. इंग्लंड |
अंतिम ए.सा. | १६ ऑक्टोबर २०१६: भारत वि. न्यूझीलंड |
प्रथम २०-२० | २ ऑक्टोबर २०१५: भारत वि. दक्षिण आफ्रिका |
अंतिम २०-२० | १८ मार्च २०१६: ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड |
यजमान संघ माहिती | |
किंग्स XI पंजाब (२०१० - सद्य) | |
शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१६ स्रोत: एच.पी.सी.ए. मैदान, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, संक्षिप्त रूप एचपीसीए मैदान, हे हिमाचल प्रदेश, भारत येथील धरमशाला शहरात वसलेले एक क्रिकेटचे मैदान आहे. धरमशाला शहर हे तिबेटच्या दलाई लामा यांचे घर म्हणून जगात सुप्रसिद्ध आहे.
स्थान आणि इतिहास
सदर मैदान हे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचे रणजी करंडक आणि इतर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीचे होम ग्राऊंड आहे. किंग्स XI पंजाबचे होम ग्राऊंड म्हणून ह्या मैदानावर आयपीएलचे अनेक सामने झाले आहेत.[१]
हे मैदान समुद्रसपाटीपासून १,४५७ मी (४,७८० फु २ इं) इतक्या उंचीवर वसलेले असून त्याची पार्श्वभूमी बर्फाच्छादित हिमालयाने व्यापलेली आहे. धरमशालाला पोहोचण्यासाठी जवळचे विमानतळ ८ किलोमीटर वर गग्गल हे आहे. असह्य हिवाळा, ज्यामध्ये पडणारा पाऊस आणि हिमवर्षाव ह्या मुळे येथे नियमित सामने होऊ शकत नाहीत.
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे माजी संचालक डेव्ह व्हॉटमोर यांनी त्यांच्या कार्यकालात सदर मैदान आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यासाठी योग्य असल्याची शिफारस केली. मैदानावर खेळणारा पहिला आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानचा होता. ते २००५ मध्ये भारत अ संघाविरुद्ध एक सामना खेळले.[१]
मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान जानेवारी २०१३ मध्ये खेळवला गेला, ज्यामध्ये इंग्लंडने गडी राखून विजय मिळवला. १७ ऑक्टोबर २०१४ रजी भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ५९ धावांनी पराभूत केले.
नोव्हेंबर २०१५ मध्ये, सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारतातील सहा नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. इतर स्थळांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, होळकर क्रिकेट मैदान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल आणि डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान ह्या मैदानांचा समावेश होता.[२]
एसीसी सेंटर ऑफ एक्सलन्स
डिसेंबर २०१५ मध्ये, आशियाई क्रिकेट परिषदेने धरमशाला येथे पहिले एक्सलन्स सेंटर उभारण्याचे ठरवले.[३] ह्या एक्सलन्स सेंटरमार्फत उपखंडातील आणि काही असोसिएट देशांच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या विकासासाठी मदत करण्याचा परिषदेचा हेतू आहे.
२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०
२१ जुलै २०१५ रोजी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० साठी मैदानांची घोषणा केली. स्पर्धेसाठीच्या निवडक आठ मैदानांपैकी एक नाव होते, धरमशाला.[४] ११ डिसेंबर २०१५, रोजी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली, त्यानुसार एचपीसीए मैदानाकडे अ गटाचे सर्व सामने आणि सुपर १० गटाच्या एका सामन्याचे यजमानपद देण्यात आले.[५]
भारत वि पाकिस्तानचा सामना सुरुवातीला ह्या मैदानावर होणार होता.[६] परंतु पाकिस्तानी संघाला गरजेची सुरक्षा पुरवण्याबाबत एचपीसीएने असमर्थता दर्शविली,[७] आणि सदर सामना इडन गार्डन्स, कोलकाता येथे हलविण्यात आला.[८]
आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी
एकदिवसीय
आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]:
दिनांक | संघ १ | संघ २ | विजयी संघ | फरक | धावफलक |
---|---|---|---|---|---|
२७ जानेवारी २०१३ | भारत | इंग्लंड | इंग्लंड | ७ गडी | धावफलक |
१७ ऑक्टोबर २०१४ | भारत | वेस्ट इंडीज | भारत | ५९ धावा | धावफलक |
१६ ऑक्टोबर २०१६ | भारत | न्यूझीलंड | भारत | ६ गडी | धावफलक |
टी २०
आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:
दिनांक | संघ १ | संघ २ | विजयी संघ | फरक | धावफलक |
---|---|---|---|---|---|
२ ऑक्टोबर २०१५ | भारत | दक्षिण आफ्रिका | दक्षिण आफ्रिका | ७ गडी | धावफलक |
९ मार्च २०१६ | बांगलादेश | नेदरलँड्स | बांगलादेश | ८ धावा | धावफलक |
९ मार्च २०१६ | आयर्लंड | ओमान | ओमान | २ गडी | धावफलक |
११ मार्च २०१६ | नेदरलँड्स | ओमान | अनिर्णित | धावफलक | |
११ मार्च २०१६ | बांगलादेश | आयर्लंड | अनिर्णित | धावफलक | |
१३ मार्च २०१६ | आयर्लंड | नेदरलँड्स | नेदरलँड्स | १२ धावा | धावफलक |
१३ मार्च २०१६ | बांगलादेश | ओमान | बांगलादेश | ५४ धावा | धावफलक |
१८ मार्च २०१६ | ऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड | न्यूझीलंड | ८ धावा | धावफलक |
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "धरमसाला आयपीएलसाठी एप्रिलपर्यंत तयार होणार" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ अरुण वेणुगोपाळ. "बीसीसीआयकडून निवड समितीमध्ये बदल, सहा नवीन कसोटी मैदानांची घोषणा" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एसीसी धरमशाला एक्सलन्स सेंटर उभारणार | क्रिकेट" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इडन गार्डनवर २०१६ ट्वेंटी२० विश्वचषकाचा अंतिम सामना होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्व ट्वेंटी२० भारत २०१६ चे वेळापत्रक". आयसीसी-क्रिकेट.कॉम (इंग्रजी भाषेत). 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "धरमशालावर होणार टी२० विश्वचषकाचा भारत वि पाकिस्तान सामना" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ गोल्लापुडि, नागराज. "भारत-पाक विश्व टी२० सामन्यावर राजकीय तंट्याचे सावट" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारत-पाकिस्तान सामना कोलकत्याला हलविला" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एच.पी.सी.ए. मैदान, हिमाचल प्रदेश / नोंदी / एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एच.पी.सी.ए. मैदान, हिमाचल प्रदेश / नोंदी / टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.