Jump to content

हिमस्खलन

हिमस्खलन

डोंगर उतारावरील बर्फ घसरण्याच्या प्रक्रियेला हिमस्खलन (इंग्लिश:Avalanche, अव्हालांच) असे म्हणतात. हिमस्खलनाच्या प्रक्रियेत खडकांचे मोठे तुकडे आणि वृक्षही कोसळतात. हिमस्खलनात शेकडो मीटर रुंद, लांब व कित्येक मीटर जाडीचा बर्फाचा ढिगारा, कित्येक कि.मी. पर्यंत प्रवास करतो. त्याखाली घरे, वस्त्या किंवा वाहने पुरली जातात.हिमस्खलन पुढील कारणांनी घडते

१. बर्फाचे वाढते वजन : अल्पावधीत मोठा हिमवर्षाव झाल्यास नव्याने साठत जाण्याऱ्या बर्फाचे वजन खालच्या बर्फास असह्य होते व उताराच्या दिशेने सरकू लागतात. २. भूकंप : भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या भूकंपलहरींमुळे बर्फ अस्थिर होतो व त्यातून हिमस्खलन होते. ३. आवाज : मोठ्या आवाजामुळे निर्माण होण्याऱ्या ध्वनीकंपनामुळे आल्प्स पर्वतात अनेकदा हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

हिमालय, आल्प्स यासारख्या पर्वतांमध्ये हिमस्खलनाच्या घटना वारंवार घडत असतात.