हितेंद्र कन्हैयालाल देसाई
हितेंद्र कन्हैयालाल देसाई (९ ऑगस्ट, १९१५:सुरत, ब्रिटिश भारत - १२ सप्टेंबर, १९९३:अहमदाबाद, गुजरात, भारत) हे भारताच्या गुजरात राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते.[१] या आधी हे जीवराज मेहतांच्या सरकारममध्ये कायदामंत्री होते. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते परंतु पक्षातून इंदिरा गांधी यांची हकालपट्टी झाल्यावर त्यांनी काँग्रेस (संघटना) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सत्ताकाळादरम्यान १९६९मध्ये जातीय दंगे झाले होते.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "List of Chief Ministers (CM) of Gujarat". Maps of India. 5 September 2021 रोजी पाहिले.
- ^ "Chronology of communal violence in India". Hindustan Times. 9 November 2011. 2013-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 February 2013 रोजी पाहिले.