हिंदू वारसा कायदा
पाहा हिंदू वारसा कायदा १९५६
कायदा क्र. ३० वर्ष् १९५६, १७ जून १६५६
हा कायदा जम्मु - काश्मिर् वगळता इतर भारताच्या सर्व राज्याना लागु आहे.
हा कायदा हिंदू, जैन, बुद्ध , शिख या धर्माच्या सर्व व्यक्तिना लागु होतो.
खालिल पैकी कुठ्ल्याही ती व्यक्ति ह्या हिंदू, जैन, बुद्ध , शिख या समाज्याची आहे असे समजण्यात येते.
- ज्याचे आई-वडील (दोघहि ) हिंदू, जैन, बुद्ध , शिख या धर्माचे आहेत.
- ज्याचे आई-वडील (दोघां पैकी एक ) हिंदू, जैन, बुद्ध , शिख या धर्माचे आहेत.आणि त्यानी पालन पोषण केले आहे.
- अशी व्यक्ति जीने धर्मांतर करून हिंदू, जैन, बुद्ध , शिख या धर्माचा स्विकार केला आहे.
‘ वारस ‘ म्हणजे अशी व्यक्ती ( स्त्री , पुरुष कोणीही ) जी या कायद्यानुसार मयत व्यक्तीच्या संम्पती मधे वाटेकरी होऊ शकते.
हा कायदा पुढिल संम्पत्तीना लागु होत नाही.
- विशेष विवाह कायदा १९५४ च्या कलम २१ च्या तरतुदीच्या अन्वये ज्या मालमत्तेची भारतीय वारसा कायदा १९२५ प्रमाणे वाटणी अथवा विभागणी झाली आहे.
- अशी मालमत्ता जीचे हस्तांतरण अथवा वारसा ह्क्क हा एकाच वारसाला देण्यासंदर्भात हा कायदा अंमलात येणेपुर्वीच तत्कालीन राजे, संस्थाने आणि तत्कालीन भारत सरकार यांच्यात तह अथवा करार झाला आहे.
- कोचिन संस्थानचे महाराजानी २९ जून १९४९ रोजी विशेष अधिकारा अंतर्गत राजवाडे, महाल, जमीन जुमला अथवा त्यांच्या देखरेखी साठी विशिष्ट मंडळ याना दिलेले अधिकार.
वारसा हक्क वाटणी संदर्भातील नियम (पुरुषांसंदर्भात )
- परीशिष्ट क्र १ मधे दिलेले वारस
- परीशिष्ट क्र १ मधे दिलेल्या वारसां पैकी कोणीही वारस नसतील तर परीशिष्ट क्र २ मधे दिलेले वारस
- परीशिष्ट क्र १ व २ मधे दिलेले वारसां पैकी कोणीही वारस नसतील तर परीशिष्ट क्र ३ मधे दिलेले नातेवाईक
वारसा हक्कांची वाटणी करताना ती सर्वसाधारणपणे परीशिष्ठातील दिलेल्या क्रमाने केली जाते उदा. परीशिष्ठातील १ मधील क्र. १ च्या वारसाना क्र. २ मधील वारसाच्या आधी प्राधान्य दिले जाते व हा क्रम वारसदार मिळेपर्यत चालु राहतो.
विभागणी करावयासंबंधिचे नियम
- मयत व्यक्तीच्या पत्नीला ( एका पेक्षा जास्त असल्यास सर्व पत्नीना मिळुन् ) एक भाग
- हयात असलेल्या प्रत्येक मुलाला अथवा मुलीला आणि हयात असल्यास आईला प्रत्येकी एक् भाग
- जर मयत व्यक्तिचा मुलगा अथवा मुलगी तो हयात असतानाच निधन पावलेले असतील तर त्याना प्रत्येकी एक भाग.
- जर मुलगा मयत असेल तर त्या मुलाच्या पत्नीला ( एका पेक्षा जास्त असल्यास त्या सगळ्याना मिळून ) त्याच्या मुलाला , मुलीला त्याच्या वाटणीचा समसमान भाग करून देण्यात यावे.
- जर मुलगी मयत असेल तर त्या मुलीच्या मुलाला , मुलीला त्याच्या वाटणीचा समसमान भाग करून देण्यात यावे.
Onkar sathe (चर्चा) १६:३७, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)