Jump to content

हिंदू देवांचे प्रकार

हिंदू धर्म हा अपौरुषेय धर्म आहे, म्हणजे त्याची स्थापना कोणत्याही माणसाने केलेली नाही असे मानले जाते. त्यामुळे तो साधनदोष (errors of instrument) आणि अभिज्ञान (cognition) यांपासून मुक्त आहे. त्यामुळे वेदग्रंथ व उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता नसती तरी हिंदूधर्म राहिलाच असता. हिंदू देव हे शाश्वत, अविनाशी आणि अमर आहेत. हिंदू देव लढाया करीत असले तरी ते अन्यायाची बाजू घेत नाहीत. ते ग्रीक आणि रोमन देवांप्रमाणे एखाद्या माणसाचा द्वेष करीत नाहीत. ते आपापसात भांडत नाहीत, एकमेकांचा मत्सर करीत नाहीत. अनेक हिंदू देव ही निसर्गातील विविध शक्तींची आणि सृष्टीतील विविध बाबींची रूपे आहेत. या हिंदू देवांमध्ये अनेक जाती आहेत. त्यांची जातिनुसार उतरंडही आहे. [ संदर्भ हवा ]

देवांमधल्या प्रमुख जाती आणि त्यांतील देव

  • वैदिक देव आणि देवता : अग्नी, अदिती, अरण्यानी, इंद्र, उषा, का, कुहू, गायत्री, दिती, पृष्णी, बृहस्पती, भू, मरुत, यम, वरुण, वायु, विश्वकर्मा, राका, रुद्र, सरस्वती, सावित्री, सूर्य, सोम
  • पौराणिक देव : कार्तिकस्वामी, दत्त, ब्रह्मदेव, विष्णू, शनी, शिव
  • ऐतिहासिक देव : भवानी, मारुती
  • लोकसंस्कृतीतील देव : खंडोबा, बालाजी
  • ग्रामीण देव : म्हसोबा, वेताळबाबा, शिंगरोबा
  • अवतार : नृसिंह (नरसिंह), परशुराम, बुद्ध, राम, वामन, श्रीकृष्ण
  • देवता : गणपती, नटराज, लक्ष्मी, शारदा, सरस्वती
  • देवी : कात्यायनी, काली, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी
  • देवपत्‍नी : इंद्राणी, गौरी, पार्वती, कुबेरपत्‍नी राजराजेश्वरी, रुक्मिणी, लक्ष्मी, सावित्री, सीता
  • देवबंधू : श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम, रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण
  • देवभगिनी : यमी
  • दुय्यम देव : कुबेर, चित्रगुप्त, तुंबरू, नारद
  • दुय्यम देवी : अन्नपूर्णा, अंबाबाई, एकवीरा, ऋद्धी, कामेश्वरी, काळूबाई, गौरी, चामुंडा, जखाई, जगद्धात्री (बंगालमध्ये), जाखादेवी, तुकाई, फिरंगाई, बाणाई, भद्रकाळी, महालक्ष्मी, म्हाळसाई, यमाई, यल्लम्मा, र(खु)खमाई, रुक्मिणी, रेणुका, ललिता, शिवदूती, सटवाई, सिद्धी
  • अर्धदेव : अप्सरा, किन्नर, गंधर्व, यक्ष, यक्षिणी आणि विद्याधर वगैरे
  • देवस्वरूप प्राणी : गणपतीचा उंदीर, इंद्राचा ऐरावत, कासव, गरुड, दत्ताची गाय आणि त्याचे कुत्रे, खंडोबाचा घोडा, शंकराचा नंदी, सरस्वतीचा मोर
  • देवस्वरूप वस्तू : लक्ष्मीचे कमळ, खंडोबाचा खंडा, मारुतीची गदा, शंकराचा व दत्ताचा त्रिशूळ, परशुरामाचा परशू, गणपतीचा अंकुश

हे सुद्धा पहा : देवांची वाहने

संबंधित पुस्तके

हे सुद्धा पहा