हिंदू दिनदर्शिका
हिंदू दिनदर्शिकेत पुढील बारा महिने आहेत.
महिन्यांच्या नावांची व्युत्पत्ती
प्रत्येक महिन्यांची नवे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे.
नक्षत्राचे नाव | महिना |
---|---|
चित्रा | चैत्र |
विशाखा | वैशाख |
जेष्ठा | जेष्ठ |
पूर्वाषाढा | आषाढ |
श्रवण | श्रावण |
पूर्वाभाद्रपदा | भाद्रपद |
अश्विनी | अश्विन |
कृतिका | कार्तिक |
मृगशीर्ष | मार्गशीर्ष |
पुष्य | पौष |
मघा | माघ |
पूर्व फाल्गुनी | फाल्गुन |
हिंदू कालगणना
हिंदू धर्मामध्ये नऊ प्रकारे कालगणना केली जाते. १.ब्राह्म, २.दिव्य, ३.पित्र्य, ४.प्राजापत्य, ५.बार्हस्पत्य, ६.सौर, ७.सावन, ८.चांद्र, ९.नाक्षत्र,
वर्ष, अयन, ऋतू, युग, इत्यादींची गणना सौरमानावरून करतात. महिना व तिथींची गणना चान्द्रमानावरून करतात. वार, सांतपनादी कृच्छ्रे, सोहेर-सुतक यांचे दिवस, वैद्यचिकीत्सादिन यांची गणना सावन मनावरून करतात. घटिकादिंची गणना नक्षत्रमानावरून करतात.