Jump to content

हिंदन नदी

हिंदन नदी ही उत्तर प्रदेशातील एक नदी आहे. ही यमुना नदीची उपनदी असून काळी नदी आणि कृष्णी कारसुनी या दोनही नद्या हिंदनच्या उपनद्या आहेत. दोघांचा उगम सहरानपूर जिल्ह्यात होतो. काळी नदी हिंदनला दुदी गावाजवळ मिळते.