हाल सातवाहन
हाल हा सातवाहन साम्राज्याचा सम्राट होता. मत्स्य पुराणानुसार हा सातवाहनांचा ७ वा राजा होता[१]. याने इ.स. २० ते इ.स. २४ या कालखंडात राज्य केले. महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाहासत्तसई (गाथासप्तशती) नामक काव्यसंग्रहाचा हा रचनाकार असल्याचे मानले जाते[ संदर्भ हवा ].