Jump to content

हार्लिंजेन (टेक्सास)

हार्लिंजेन अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६४,८४९ होती. हे शहर टेक्सासच्या दक्षिणेस असलेल्या कॅमेरॉन काउंटीमध्ये असून ब्राउन्सव्हिल महानगराचा एक भाग आहे.

येथे युनियन पॅसिफिकचा मोठा मालधक्का असून तेथून देशभरातील सामानाची आयात-निर्यात होते. हार्लिंजेन इंटरस्टेट २ या महामार्गाचे पूर्वेकडील टोक असून येथे हा महामार्ग आय-६९ईला मिळतो.