Jump to content

हातगड

हातगड

हातगड
नावहातगड
उंची
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणनाशिक, महाराष्ट्र
जवळचे गावनाशिक,बोरगाव,हातगडवाडी
डोंगररांगसातमाळ
सध्याची अवस्थाचांगली
स्थापना{{{स्थापना}}}


हातगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

सुरगणा हा नाशिक जिल्ह्यामधील एक तालुका आहे सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरुवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळ रांग असे म्हणतात. याच रांगेच्या उपशाखेवर हातगड किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी राजांचा नाशिकचा दख्खनी लढवय्या किल्लेदार गोगाजीराव मोरे यांनी हा हातगड (नासिक) किल्ला राजांना जिंकून दिला.

सुरतकडून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर हा हातगड किल्ला आहे. गुजरातमधील प्रसिद्ध हिलस्टेशन सापुताराकडे जाताना महाराष्ट्राच्या सीमेवर सापुतारापेक्षाही अधिक उंचीचा हातगड आहे. सह्य़ाद्रीतल्या सातमाळा रांगेत काहीसा सुटावलेला हा किल्ला. हे काही संरक्षित जंगल नाही. पण येथे स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काही उपक्रम राबवले जातात आणि पर्यायाने हा परिसर आता पर्यटनाच्या नकाशावर हळूहळू आपले स्थान मिळवत आहे. सुरगाणा तालुक्यातील हे छोटेसे गाव तसे आदिवासीच म्हणावे लागेल.

पायथ्याच्या हातगडवाडीतून चढण्यास सोपा आणि आटोपशीर चढणीचा असा हा किल्ला आहे. १६ व्या शतकात बुरहान निजामशाहने जिंकून घेतलेल्या ५८ किल्ल्यांच्या यादीत याचा हाटका असा उल्लेख असल्याची माहिती मिळते. पेशवाईत हा किल्ला मराठय़ांकडे होता. हातगडवाडी हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले गाव आहे. निसर्गसंपन्न अशा या गावात पेशवेकालीन घोडय़ाच्या पागा तसेच पाण्याचे कुंड पाहावयास मिळतात. या गावातील वनपर्यटनाला चालना मिळण्यासाठी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. येथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते, त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पर्यटकांसाठी निवारा शेड, माहिती केंद्र, रोपवने, विविध पॉइंट मनोरे अशी अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. हातगड किल्ल्यावर जाण्यासाठी हातगडवाडीतून गाडीरस्तादेखील तयार करण्यात आला आहे. वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही उपलब्ध आहे. गाडीरस्ता जिथे संपतो तेथून वर जाण्यासाठी अगदी पंधरा मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे. प्रवेशद्वारावरील शिल्प आणि शिलालेख लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या तटबंदीच्या बाहेर छोटा सपाट भाग आहे. राणीचा बाग म्हणून तो स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे. गंगा-जमुना या बारमाही पाण्याच्या टाक्यांबरोबरच इथे अनेक इतर पाण्याच्या टाक्याही आहेत. धान्य साठविण्याचा एकांडा बुरुज, स्वयंपाकाची वास्तू आणि दारूगोळ्याचे कोठार ही माथ्यावरच आहे. किल्लेदाराचे घर, पेशवेकालीन ध्वजस्तंभ अशा अनेक प्राचीन वास्तू आणि वस्तू तत्कालीन काळाचे दर्शन घडवतात. गडावर किल्लेदार गोगाजीराव मोरे यांची समाधी आहे.

गडमाथ्यावर सहजतने फिरण्यासाठी वन विभागातर्फे दगडी पायऱ्यांचा मार्ग बांधला आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य न्याहाळता येते. सातमाळा रांगेचे आणि साल्हेर या सर्वोच्च गिरिदुर्गाचे दर्शन होते. सापुतारापेक्षा उंच असल्यामुळे सापुताराचा मोहक नजारा दिसतो. नाशिक ते हातगड अंतर ७५ कि.मी. आहे. वणी ते हातगड अंतर ३५ कि.मी.चे आहे. सापुतारा ते हातगड अंतर सहा कि.मी.चे आहे. मुंबईहून हातगड अंतर २४० कि.मी. आहे. हातगडवाडीत अनेक हॉटेल तसेच रिसोर्ट्स राहण्यासाठी उपलब्ध आहेत. हातगड पाहण्यास गेल्यावर सापुतारा, सप्तशृंगी गड, ओझरखेड धरण, चणकापूर धरण, तानापाणी गरम पाण्याचे झरे अशी अनेक ठिकाणे पाहता येतात.

नाशिकहून वणीगावात आल्यावर सप्तश्रृंगीदेवीकडे न जाता सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे. तेथून २० किलोमीटरवर गेल्यावर उजव्या हाताला आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच हातगड. हातगडाचे मूळ नाव हतगरू म्हणजे हद्दीवरचा गड. हा गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. हातगडाच्या अलीकडे महाराष्ट्र तर पलीकडे गुजरात सुरू होते.

  • ' हतगडावरून सापुताऱ्याचा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे. हतगडाला हस्तगिरी असेही म्हणले गेले आहे.
  • बागूल राजांचा कवी रूद राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम या ग्रंथात बागूल राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारर्कीद १३०० ते १७०० अशी आहे. रूद्र कवीने १५९६ मध्ये राष्ट्रौढवंशम् हे महाकाव्य लिहिले. हतगडावरील शके १४६९ (सन१५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यापूर्वी हतगड निजामशाहीत होता. बागूल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला. दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसते. याबाबतही इतिहासात असा उल्लेख मिळतो की, अबकर बादशहाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल्ल याने मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते. तेव्हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला. हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ मध्ये सोन्याचा किल्ला विजय प्रतीकचिन्ह सादर केला. यावेळी बादशहाने हसनअलीला `खान’ ही पदवी देत त्याचे सैन्य वाढविण्यात आले. हतगडचा उल्लेख किल्ल्यातील शिलालेखात हातगा दुर्ग असाही आला आहे. अपभ्रंश होत आलेल्या हतगड किल्ल्याच्या नावाप्रमाणेच हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हतगडवाडीनेही अनेक लढाया सोसल्या आहेत. राजांप्रमाणे सतत बदलत जाणारे गावकरी अन् त्यांच्या जातीधर्मानुसार सण, परंपराही गावाने पाहिल्या आहेत. किल्ल्यावर जाण्यापूर्वी गावाची सफर करताना गावाभाोवती किल्ल्याची तटबंदी मुगलांनी बांधल्याच्या खाणाखुणा पाहायला मिळतात. एक मशीद व पुरातन असे दगडकामात केलेले छोटेखानी तळेही पाहायला मिळते.

गावात प्रवेश करताच एक महादेव मंदिर लागते.. हे पुरातन शिवमंदिर बाराव्या शतकातील होते. याचा नंतर जिर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरावरही एक शिलालेख होता. असे एकूण सहा शिलालेख व सहा ताम्रपट हतगड किल्ल्याचा इतिहास उलगडतात.

  • महादेव मंदिराच्या जवळच गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख यांची दगडातील बांधणीतील नक्षीकाम केलेली समाधी आहे. ही समाधी कोणाची अन् हतगडच्या इतिहासाशी याचा काय संबंध याची माहिती मनोहर मोरे-देशमुख उलगडन सांगतात. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्यांपैकी एक. दख्खनच्या मोहिमेसाठी त्यांना शके १५८५ (सन १६६३) मध्ये सुरगणा परिसरात पाठविले होते. यावेळी हतगड किल्ला आदिलशाहाचा सुभेदार शुराबखान हा किल्लेदार होता. गोगाजीराव मोरे* यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला शके १५८६ (सन १६६३) मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला आपल्या ताब्यात असणे गरजेचे असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी गोगाजी मोरेंना पाठवून हा किल्ला ताब्यात मिळविल्याचे स्पष्ट होते.
  • गोगाजीराव मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हतगड परिसरातील बारा गावांची देशमुखी दिली होती.
  • त्यानंतरच्या उल्लेखानुसार १६८८ मध्ये हसन अलीखानाने हा किल्ला पुन्हा ताब्यात मिळविला. याच दरम्यान, किल्लेदार गोगाजीराव मोरे यांचा मृत्यू झाला असावा, त्यामुळे त्यांची समाधी गावात आहे. गोगाजी मोरे-देशमुख व शिंदे-देशमुखांचे वंशंज दामोदर त्र्यंबक शिंदे-देशमुख यांचे वाडे हतगडाच्या पायथ्याशी होते. त्याचे फक्त अवशेष आता पहायला मिळतात. गावातील किल्ल्याशी संबंधित मोरे, शिंदे हे लोक आता आजूबाजूच्या तालुक्यात, गावांमध्ये विखुरले आहेत. त्यामुळे हतगड आता फक्त आदिवासी समाजच राहत असल्याचे दिसते. गोगाजी मोरे यांचे वशंज मनोहर हनुमंत मोरे-देशमुख सुमारे ४० वर्षांपूर्वी जवळच्या पाळेगावात विस्थापितत झाले. गावात हनुमान मंदिर, महादेव मंदिर व इतरही लहान लहान मंदिरे आहेत. गावात बोहाड्याचा उत्सव केला जातो. शंभर उंबऱ्यांची हतगडवाडी आता आधुनिक रिसॉर्ट संस्कृतीचे रूप धारण करू लागली आहे.

हतगड किल्ला व परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे. हतगडाची सफर आता खूप सोपी झाली आहे. वरपर्यंत गाडीने जाता येते तर गडाच्या पूर्वेकडे नव्याने पायऱ्यांची पायवाट बनविण्यात आली आहे. या पायवाटेने वर गेल्यावर हतगडाच्या पायथ्याशी स्थिरावलेली हतगडवाडी पहायला मिळते अन् पूर्वीचे गाव कसे असेल याची प्रचितीही येते. उभ्या कातळात कोरलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अन् त्यानंतर चार उपप्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करता येतो. मुख्य प्रवेशद्वारावर दोन शिलालेख आहेत. हे दोन्ही शिलालेख देवनागरीत आहे. शिलालेखांची अक्षरे पुसट झाली आहेत. मोहनराव मोरे यांच्या नोंदीत प्रवेशद्वाराच्या पहिल्या शिलालेखावर `श्री प्रतापस्य ही कारकीर्द शेवुजी पंडित यांचे छत्रछायेत आहेत. हिंदू पंडित शेवुजी’ असे तर दुसऱ्या शिललेखात नवीन श्रीपती प्रतापस्य कारकीर्द त्रासजी पंडीत सुत्र सर्व छत्र छायेत’ असे म्हणले आहे. तेथून आत गेल्यावर उजव्या हाताला कातळात कोरलेल्या गुहा आहेत, ही सैन्याचे राहण्याची जागा असावी. थोडे पुढे गेल्यावर डावीकडे सुमारे ४७० वर्षांपूर्वी कोरलेला शिलालेख पहायला मिळतो. या किल्ल्याचे अवशेष काही प्रमाणात सुस्थितीत असल्याने किल्ला भटकायला मजा येते. तटबंदी, पाण्याचे टाके, धान्य कोठार, दरबारी इमारतीचे अवशेष अन् जलव्यवस्थापानाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. येथील एका कबरीच्या समोरील कमानीवरही एक फारसी शिलालेख होता. हा कमान जागेवर नाही. विशेष म्हणजे हतगडाचा नकाशा चक्क ताम्रपटावर काढण्यात आल्याचे मोरे यांच्या संग्रहातील ताम्रपटातून दिसते. हा ताम्रपट हातात घेऊन किल्ला न्याहाळल्यावर तो तसाच असल्याचे लक्षात येते. त्यांच्याकडील एक राजमुद्रा वैशिष्टपूर्ण असून, हतगड ताब्यात घेण्यासाठी छत्रपतीनी ती आदेश स्वरूपात दिल्याचे मोरे सांगतात. एका ताम्रपटावर `शके १५९६ सुबेदार गंगाजी मोरे.दे. ऊर्फ गोगाजी शिंदे अधिकारी चीमनाजी बाबुराव देशपांडे हतगड सदनदाकल देशपांडे प्रा//. मचुकुर हतगड श्रावण शु.पा.’ असे लिहिले आहे. अशा अनेक खाणाखुणांमधून हतगडचा इतिहास समोर येतो. हतगड स्वच्छसुंदर ठेवण्यासाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे. जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच आणि कचऱ्यामुळे हतगड धोक्यात आला आहे. इतिहासात महत्त्वाच्या कामगिरी निभावलेल्या हतगडवाडीच्या सुवर्णमय इतिहासावर संशोधन होण्याची गरज असल्याची साद येथील पाऊलखुणा घालतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[] गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात. पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते.येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे.गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत.या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत जाता येते. दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुद्धा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत.या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो.गडमाथा खूप विस्तीर्ण आहे.दरवाज्यातून वर आल्यावर पायऱ्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे.समोरच एक पीर आहे.उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके आहे. दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी.येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात.येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव आहे.यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरुज आहे.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरुज आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

१.हातगडवाडी मार्गे हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे.नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे.येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुताऱ्याला जातो.सापुताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे.गावातन एक डांबरी रस्ता कळवणला जातो या रस्त्यावरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची.पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते.या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी रस्ता सोडून आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरावी. या वाटेन १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या छाडाखाली पोहचतो.पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास साधारणतः पाऊण तास लागतो.

पाण्याची सोय

किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले
  1. ^