Jump to content

हाओबाम ओंग्बी न्गांगबी देवी

हाओबाम ओंग्बी न्गांगबी देवी (१ ऑगस्ट, इ.स. १९२४:इंफाळ, मणिपूर - १२ जून, इ.स. २०१४:इंफाळ) या भारतीय नर्तिका होत्या. या मणिपुरी नृत्यात निष्णात होत्या.

त्या वयाच्या पाचव्या वर्षापासून मणिपुरी नृत्य शिकल्या व सहाव्या वर्षी त्यांनी जलपाईगुडी उत्सवात भाग घेतला. त्या शास्त्रीय संगीतही शिकल्या होत्या. यांनी जवाहरलाल नेहरू मणिपुरी नृत्य अकादमी मध्ये अध्यापन केले.

Lai haraoba

भारतीय शासनाने २०१० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.

त्यांनी १९४१ साली हाओबाम अमुबा सिंग यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे.