Jump to content

हस्तकला

हस्तकला

हस्तकला म्हणजे हात किंवा / व साधी हत्यारे/उपकरणे वापरून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू आहेत.हा कले चा पारंपारिक भाग आहे.यात कातणे,विणणे, सुईकाम, जरीकाम,शिवणकाम, बाहुल्या बनविणे, कोरीवकाम,नक्षीकाम ,सुतारकाम कुंभारकाम अश्या सारख्या कामांचा समावेश होतो.भारत यासाठी प्रसिद्ध आहे.कलेचे महत्त्व

ज्या भावना, जे विचार शब्दांत सांगता येत नाहीत व मांडता येत नाहीत ते अनेकदा कलेच्या माध्यमातूर व्यक्त करणे जास्त परिणामकारक होते.

कलेमुळे आपले जीवन आनंदी व समृद्ध होते. कलेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात आणि त्यातून

परस्परांबद्दलचा आदर वाढतो. जगण्यातील सौंदर्य वाढवण्याची वृत्ती

तयार होते. आपण स्वतःलाही चांगल्या प्रकारे ओळखू शकतो.

कोणत्याही समाजामध्ये मग तो सुशिक्षितांचा, अशिक्षितांचा मागासलेला किंवा सुसंस्कृत पुढारलेला असो, कलानिर्मिती है लोकजीवनाचे एक आवश्यक अंग बनले आहे.

कलेचा विकास हा कोणत्याही शास्त्रीय प्रगतीवर अवलंबून नाही. अगदी प्राचीन काळातही इजिप्त मेसोपोटेमिया भारत, चीन, ग्रीस, इ. देशांमधील मानव प्रगत नसतानाही कलाक्षेत्रात त्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केल्याचे दिसून येते.

भारतीय संस्कृतीमध्ये खूप प्राचीन काळापासून उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. अजिंठा, वेरूळ, घारापुरी, एलिफंटा केव्हज, कोपेश्वर शिवमंदिर, खजुराहो, हळेबीड, बंगळूर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे उत्तम शिल्पकला आपण पाहू शकतो.