Jump to content

हल्लीकर गाय

हल्लीकर गाय
मूळ देश भारत
आढळस्थान म्हैसूर जिल्हा (पेरियापट्टांना), रामानगर जिल्हा (मागडी, कनकपुरा), मंड्या जिल्हा (नागामंगला)
उपयोग शेतीकाम, शर्यत
वैशिष्ट्य
वजन
  • बैल:
    २३०–२५० किलो (५१०–५५० पौंड)
  • गाय:
    १८०–२०५ किलो (४००–४५० पौंड)
उंची
  • बैल:
    ca. 165.30 सेंमी
  • गाय:
    ca. 115.12 सेंमी
आयुर्मान 19 वर्ष
डोके लांब आणि कपाळ अरुंद
पाय लांब आणि काटक
शेपटी लांब, शेपूटगोंडा काळा व झुपकेदार
तळटिपा
प्रांतानुसार खालील मुख्य उपजाती आहेत -सुजी मलिंगे हल्लीकार, बेट्टादापूरा हल्लीकार, गुज्जी मावू किंवा करदल्ली हल्लीकार, अमरावती हल्लीकार, जाला हल्लीकार, इत्यादी.

हल्लीकर हा कर्नाटकात आढळणारा गोवंश असून याचा शेती आणि कष्टाच्या कामासाठी चांगला उपयोग होतो.[] बैलाचा उंच खांदा, लांब आणि पाठीमागे, आत वाळलेली शिंगे, मोठं डोकं, काटक आणि उंच शरीर, राखाडी आणि कधीकधी काळा रंग ही या गोवंशाची ओळख आहे.[][]

अमृतमहाल प्रजातीची निर्मिती यांच्या पासून झाली असे म्हणतात. अमृतमहाल सोबतच या प्रजातिला राजाश्रय मिळाला होता.[] टिपू सुलतानाने इंग्रजांच्या विरोधातील लढाईत सामान वाहून नेण्यासाठी या प्रजातीचा वापर केला होता. मैसूर, तुमकुर हसन या प्रांताला हल्लीकर म्हणून ओळखले जाते. आणि याच प्रांतात ही प्रजाती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. आणि यावरूनच यांचं नाव सुद्धा हल्लीकर असे पडले. सामान्य पण नियमित खुराक या प्रजातीसाठी पुरेसा आहे. जरी अल्प दूध देणाऱ्या अमृतमहाल गाईची निर्मिती हल्लीकर गोवंशा पासून झालेली असली तरी पण मुळात हा गोवंश दूध देण्यात पण उत्तम आहे. शेती उपयुक्त बैल आणि दुग्धजन्य पदार्थ ही या गोवंशाची विशेषता मानली जाते.[][]

कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये सुद्धा या प्रजातीचा प्रसार आणि वापर चांगला झाला.

सण २००० मध्ये भारतीय डाक विभाग तर्फे या प्रजातीचा फोटो असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले होते.[]

हल्लीकर गोवंश, इ.स. २,००० मधील प्रकाशित पोस्टाचे तिकीट

शारीरिक रचना

हल्लीकार ही मूळची दक्षिण कर्नाटकात म्हैसूर जवळ आढळणारी प्रजात आहे व ती महाराष्ट्रात म्हैसुरी या नावाने प्रचलीत आहे. ह्या जातीचे बैल काटक व चपळ असल्यामुळे यांचा वापर शर्यतीसाठी होतो. याच कारणामुळे हल्लीकार म्हणजेच म्हैसुरी बैलांचा वापर पश्चिम महाराष्ट्र मध्ये फायनल व घाटातील शर्यत या प्रकारांमध्ये वाढू लागला. काही बैल चांगले पळायला लागल्यामुळे हळू-हळू या जातीचा वापर वाढू लागला.

रंग: हल्लीकर मध्ये काळा, गडद कोसा, हरणा रंग आढळतात. हल्लीकर बैल बडवल्या नंतर फिक्कट कोसा किंवा काळसर रंग धारण करतात.

पाय: पायाच्या हाडांची जाडी कमी असते.

कांबळ: गळ्यापासून छातीपर्यंत एका सरळ रेषेत असते.

चेहरा: एकदम निमुळता असतो आणि कपाळ अरुंद असते.

शिंग: शिंग बहूतांश सरळ आणि पुढच्या बाजूला झुकलेली असतात. शिंगाचे बुडामधील अंतर अतिशय कमी असते.

शरीर: खिल्लारच्या तुलनेत शरीरं सडपातळ असते.

वशिंड: लहान असते.

हल्लीकारचे निकष

नाव माहिती
रंग
शिंग
पाय
कांबळ
चेहरा
शरीर
वशिंड

हल्लीकार गोवंशाचे उपप्रकार

  1. सुजी मलिंगे हल्लीकार:
  2. बेट्टादापूरा हल्लीकार:
  3. गुज्जी मावू किंवा करदल्ली हल्लीकार:
  4. अमरावती हल्लीकार:
  5. जाला हल्लीकार:

प्रदेश

  • हल्लीकार प्रदेश: म्हैसूर जिल्हा (पेरियापट्टांना), रामानगर जिल्हा (मागडी, कनकपुरा), मंड्या जिल्हा (नागामंगला)
हल्लीकर गाय
हल्लीकर बैल

वापर

या जातीचे बैल प्रामुख्याने शेतीकाम व शर्यतींसाठी वापरले जातात.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Rao, C. Hayavadana (1927). Mysore Gazetteer. 1. Bangalore: Government Press. p. 246.:”Hallikara Vokkaligas.—This is a section that is mainly engaged in the rearing of cattle. The breed of that name is the best in the far-famed Amrut Mahal Cattle.”
  2. ^ "Hallikar - Vishwagou". 12 March 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Cattle Throughout History". Dairy Farmers of Washington. 27 May 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-12-11 रोजी पाहिले.
  4. ^ "Breeds of Livestock - Amrit Mahal Cattle". Ansi.okstate.edu. 2010-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-12-11 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Important Breeds of Karnataka - Hallikar". Department of AH & VS, Karnataka. 18 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 May 2015 रोजी पाहिले.
  6. ^ Native Cow Varieties of India - Hallikar
  7. ^ "Commemorative Postage Stamps of India - Postage Stamps:: Postage ..." (इंग्रजी भाषेत). 2018-11-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-27 रोजी पाहिले.