हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प
oil refinery in West Bengal, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | तेल शुद्धीकरण प्रकल्प | ||
---|---|---|---|
उद्योग | petroleum industry | ||
स्थान | भारत | ||
| |||
हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा हल्दिया रिफायनरी ही पश्चिम बंगाल राज्यातील हल्दिया शहरात स्थित इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे संचालित तेल शुद्धीकरण कारखाना आहे. या रिफायनरीची प्रतिवर्षी ८ दशलक्ष टन क्षमता आहे.[१] ही रिफायनरी १९७५ मध्ये कार्यान्वित झाली आणि कोलकात्यापासून १३६ किमी अंतरावर हल्दी आणि हुगळी नदीच्या संगमावर आहे.[२] या रिफायनरीमध्ये एलपीजी, नॅफ्था, पेट्रोल, मिनरल टर्पेन्टाइन ऑईल, सुपीरियर केरोसीन, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल, हाय स्पीड डिझेल, ज्यूट बॅचिंग ऑइल यासारखी विविध इंधन उत्पादने तयार केली जाऊ शकतात.[२][३][४]
संदर्भ
- ^ "Refining | IndianOil Refining". iocl.com. 2023-01-08 रोजी पाहिले.
- ^ a b "Haldia Refinery | Petroleum Refinery | IndianOil". iocl.com. 2023-10-19 रोजी पाहिले.
- ^ Singh; Singh (2016-07-25). "Oil Refineries in India". Best Notes for UPSC Prelims 2023 with Amazing Results ! (इंग्रजी भाषेत). 2023-01-08 रोजी पाहिले.
- ^ "Haldia Refinery | Petroleum Refinery | IndianOil".