Jump to content

हरी सिंग

महाराजा हरी सिंग, (जन्म २३ सप्टेंबर १८९५ जम्मू, मृत्यू २६ एप्रिल १९६१ मुंबई) हे भारतातील जम्मू व काश्मीर या शाही राज्याचे शेवटचे राजे होते. त्यांच्या तिन्ही राण्या तरुणपणीच वारल्यानंतर त्यांचे लग्न महाराणी तारा देवी (१९१०-१९६७) या त्यांच्या चौथ्या पत्नीशी झाले. त्यांना युवराज करण सिंग नावाचा पुत्र आहे.

पूर्वायुष्य

महाराज हरी सिंग यांचा जन्म २३ सप्टेंबर १८९५ साली जम्मूतील अमर महाल नावाच्या राजवाड्यात झाला. राजा सर अमर सिंग (जन्म १४ जानेवारी १८६४ - मृत्यू २६ मार्च १९०९) यांचे ते एकमेव जीवित पुत्र होते.