हरी शिवदासानी
हरी शिवदासानी (१९०९:कराची, पाकिस्तान - १९९४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे हिंदी चित्रपट अभिनेते होते. मूळ कराचीचे असलेले शिवदासानी भारताच्या फाळणीनंतर मुंबईस स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत ७०पेक्षा अधिक चित्रपटांतून कामे केली.
शिवदासानी हे चित्रपट अभिनेत्री बबिताचे वडील तर साधनाचे काका होत. करिश्मा कपूर आणि करीना कपूर या त्यांचा नाती होत.