Jump to content

हरिहर किल्ला

हरिहर किल्ला

नावहरिहर किल्ला
उंची३६७६ फूट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीअवघड
ठिकाणनाशिक,महाराष्ट्र
जवळचे गावहर्षवाडी , निर्गुडपाडा
डोंगररांगसह्याद्री
सध्याची अवस्थाउत्तम
स्थापना{{{स्थापना}}}


हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.

ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील ८०° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड ३६७६ फूट आहे.गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे.[] इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.

गणितीय कोडे

पहिला मार्ग:- नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.

दुसरा मार्ग:- नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.[]

तिसरा मार्ग :- कसारा - खोडाळा मार्गावरून जाताना देवगावपासून १ किमी अलीकडेच डाव्या बाजूस असलेल्या खोडाळा - टाके हर्ष मार्गाने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.

संदर्भ

हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले

संदर्भ