हरिश्चंद्र माधव बिराजदार
भारतीय कुस्तीपटू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ५, इ.स. १९५० लातूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर १४, इ.स. २०११ | ||
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय |
| ||
| |||
हरिश्चंद्र माधव बिराजदार (५ जून, इ.स. १९५०; रामलिंग मुदगड, लातूर जिल्हा, महाराष्ट्र - १४ सप्टेंबर, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे पहिलवानी कुस्ती खेळणारे मराठी कुस्तीगीर व कुस्ती-प्रशिक्षक होते. स्कॉटलंड येथे झालेल्या इ.स. १९७० सालातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तर इ.स. १९७२ साली त्यांनी भारतातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद जिंकून रुस्तम-ए-हिंद किताब मिळवला होता. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यावर ते कुस्ती-प्रशिक्षक म्हणून काम करत होते. पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत ते कुस्ती शिकवत असत.
जीवन
५ जून, इ.स. १९५० रोजी महाराष्ट्राच्या वर्तमान लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या गावी हरिश्चंद्र बिराजदारांचा जन्म झाला. त्यांचे वडील पहिलवान होते. हरिश्चंद्रांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची आई निवर्तली[१]. वडिलांनी कुस्ती खेळण्यातले हरिश्चंद्रांच्या अंगचे गुण हेरून त्यांना इ.स. १९६५ च्या सुमारास तालीम करण्यासाठी कोल्हापुरास गंगावेस तालमीत धाडले. इ.स. १९६९मध्ये दादू चौगुले याला हरवत त्यांनी महाराष्ट्रकेसरी किताब पटकावला. त्याच वर्षी कानपूर येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी हिंदकेसरी किताबही जिंकला. स्कॉटलंडमधील एडिंबरा येथे झालेल्या इ.स. १९७० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी कुस्तीतले सुवर्णपदक जिंकले. इ.स. १९७२ साली वाराणसी येथे झालेल्या भारतातल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी नेत्रपाल नावाच्या दिल्लीच्या कुस्तीगिराला हरवत रुस्तम-ए-हिंद किताब पटकावला. इ.स. १९७७ साली बेळगाव येथे झालेल्या मैदानी कुस्तीच्या मुकाबल्यात त्यांनी दिल्लीच्या बिर्ला आखाड्याच्या सतपाल मल्लास हरवण्याचे आव्हान जिंकले[१].
संदर्भ
- ^ a b राजेंद्र जोशी. "'रुस्तम-ए-आखाडा' [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २१ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
बाह्य दुवे
- "व्यक्तिवेध : हरिश्चंद्र बिराजदार[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २१ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य) - "बिराजदार यांची ओळख". २१ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]