Jump to content

हरिशंकर परसाई

हरिशंकर परसाई (जन्म : जमानी-हुशंगाबाद (मध्य प्रदेश), २२ ऑगस्ट १९२४; - जबलपूृर, ऑगस्ट १९९५) हे एक हिंदी विनोदी लेखक आणि वक्ते होते. ते नागपूर विद्यापीठाचे एम.ए.(हिंदी) होते.[ संदर्भ हवा ]

वयाच्या १८व्या वर्षी ते जंगल खात्यात नोकरीला लागले, पुढे ६ महिने त्यांनी खांडव्याला शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४१-४३ या काळात त्यांनी जबलपूर येथून बी.टी. केले. तत्पूर्वीच, म्हणजे १९४२पासून त्यांची तेथील माॅडेल हायस्कूलमध्ये अध्यापकाची नोकरी सुरू झाली होती. सन १९५२मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडली १९५३ ते १९५७ या काळात खासगी शाळेत शिकवले. १९५७मध्ये हीही नोकरी सोडून ते पूर्णवेळ लेखक बनले, त्यासाठी त्यांनी जबलपुरात वसुधा नावाचे साहित्यप्रधान मासिक काढले. याशिवाय त्यांचे 'नई दुनिया'मधून 'सुनो भइ साधो','नयी कहानियाँ'मधून 'पाँचवाँ कालम' और 'उलझी–उलझी' आणि 'कल्पना'मधून 'और अन्त में' आदी सदरे, ललित लेख, कादंबऱ्या इत्यादी प्रसिद्ध होऊ लागले त्यांमधूनच हरिशंकर परसाई विनोदी लेखक म्हणून ख्यातनाम झाले.[]

हरिशंकर परसाई यांचे कथासंग्रह आणि कादंबऱ्या

  • जैसे उनके दिन फिरे (कथासंग्रह)
  • ज्वाला और जल (कादंबरी)
  • तट की खोज (कादंबरी)
  • तिरछी रेखाएंँ (आठवणी)
  • भोलाराम का जीव (कथासंग्रह)
  • रानी नागफनी की कहानी (कादंबरी)
  • हँसते हैं रोते हैं (कथासंग्रह)[ संदर्भ हवा ]

लेखसंग्रह

  • अपनी अपनी बीमारी
  • आवारा भीड़ के खतरे
  • ऐसा भी सोचा जाता है
  • काग भगोड़ा
  • तब की बात और थी,
  • तुलसीदास चंदन घिसैं
  • पगडण्डियों का जमाना
  • परसाई रचनावली (हरिशंकर परसाईंचे एकूण साहित्य, सहा खंड)
  • प्रेमचन्द के फटे जूते
  • बेइमानी की परत
  • भूत के पाँव पीछे
  • माटी कहे कुम्हार से
  • विकलांग श्रद्धा का दौर
  • वैष्णव की फिसलन
  • शिकायत मुझे भी है
  • सदाचार का ताबीज
  • हम एक उम्र से वाकिफ हैं[ संदर्भ हवा ]

नाटके

हरिशंकर परसाई यांच्या कथांवर आधारलेली अनेक नाटके लिहिली गेली आणि लिहिली जातच आहेत. ज्यांचे नाट्यरूपांतर झाले आहे अशा काही कथा :-

  • उखडे खंबे
  • एक फिल्मी कथा
  • एक हसीना पांच दीवाने
  • घेरे की भीतर
  • दलाली
  • प्रेमियों की कहानी
  • भोलाराम का जीव

हरिशंकर परसाई यांना मिळलेले पुरस्कार

  • 'विकलांग श्रद्धा का दौर'साठी साहित्य अकादमी पुरस्कार []
  • शरद जोशी पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Nobody's Cheerleader, The Hindu
  2. ^ Awards 1955–2007 Archived 2007-07-04 at the Wayback Machine. Sahitya Akademi Official website.