हरियाली तृतीया
हरियाली तीज हे विवाहित महिलांनी करावयाचे एक धार्मिक व्रत आहे.[१] हे व्रत प्रामुख्याने उत्तर भारत. मध्य प्रदेश, राजस्थान या भागात अधिक प्रचलित आहे. श्रावण महिन्याच्या तृतीया तिथीला हे व्रत केले जाते. पावसाळ्यात पृथ्वी हिरवीगार झालेली असते त्यामुळे या व्रताला हरियाली असे नाव मिळाले आहे.
स्वरूप
या व्रताचा महत्वाचा भाग म्हणजे शिव आणि पार्वती या दैवतांची पूजा होय. विवाहित महिला या दिवशी हातावर मेहंदी काढतात, नवा पोशाख व अलंकार परिधान करतात आणि उत्सवाचा आनंद घेतात.घीवर, बालुशाही, शक्करपार, जिलबी असे पदार्थ या व्रतासाठी केले जातात. महिला झाडाला झोके बांधतात आणि त्यावर खेळण्याचा आनंद घेतात.[२]
संदर्भ
- ^ Jagranjosh (2021-09-06). Current Affairs September 2021 eBook: By Jagranjosh (इंग्रजी भाषेत). Jagran Prakashan Ltd.
- ^ Singh, Manoj (2021-03-28). Sanatan Dharma: Vaidik Gateway to the Next Century (इंग्रजी भाषेत). Bloomsbury Publishing. ISBN 978-93-89449-06-8.