हम आपके हैं कौन..!
हम आपके हैं कौन..! | |
---|---|
दिग्दर्शन | सूरज बडजात्या |
निर्मिती | राजश्री प्रोडक्शन्स |
कथा | सूरज बडजात्या |
पटकथा | सूरज बडजात्या |
प्रमुख कलाकार | माधुरी दीक्षित सलमान खान रेणुका शहाणे मोहनीश बहल |
संवाद | सूरज बडजात्या |
संगीत | राम लक्ष्मण |
पार्श्वगायन | लता मंगेशकर एस.पी. बालसुब्रमण्यम कुमार सानू उदित नारायण |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ऑगस्ट ५ १९९४ |
वितरक | राजश्री प्रोडक्शन्स |
अवधी | २०० मिनिटे |
पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार १९९४ सर्वोत्कृष्ट चित्रपट फिल्मफेअर पुरस्कार १९९४ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (सूरज बड़जात्या) फिल्मफेअर पुरस्कार १९९४ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (माधुरी दीक्षित) |
हम आपके हैं कौन..! हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट प्रचंड गाजला व त्याने जगभर सुमारे १.३५ अब्ज रुपयांची मिळकत केली. ह्या चित्रपटाला ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
कलाकार
- माधुरी दीक्षित - निशा चौधरी
- सलमान खान - प्रेम
- रेणुका शहाणे - पूजा चौधरी
- मोहनीश बहल - राजेश
- आलोक नाथ - कैलाशनाथ
- अनुपम खेर - प्रो. सिद्धांत चौधरी
- रिमा लागू - प्रो. सिद्धांत चौधरची पत्नी
- लक्ष्मीकांत बेर्डे - लल्लूप्रसाद
- प्रिया बेर्डे - चमेली
- हिमानी शिवपुरी - रझिया
पार्श्वभूमी
कथानक
प्रेम आणि राजेश हे दोघे सख्खे भाऊ आहेत, ज्यांनी लहानपणीच त्यांच्या आई वडिलांना गमावलेलं असतं. कैलाशनाथ जे त्यांचे काका असतात तेच त्यांना वाढवतात. आता राजेश त्यांचा कौटुंबिक उद्योग सांभाळत असतो. त्याचे कुटुंबीय त्याचं लग्न लावून द्यायचे ठरवतात. कैलाशनाथच्या जुन्या मित्राची मुलगी पूजा, जी एक चांगली, निर्मळ आणि प्रेमळ स्वभावाची असते तिच्याशी त्याचे लग्न ठरते आणि साखरपुडा होतो. दरम्यान प्रेमची ओळख होते पूजाची धाकटी बहीण निशाशी. निशाचा स्वभाव नटखट, मस्तीखोर असतो.
पुरस्कार
- फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
- फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
- फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
बाह्य दुवे
- अधिकृत पान Archived 2012-04-24 at the Wayback Machine.
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील हम आपके हैं कौन..! चे पान (इंग्लिश मजकूर)