हमीद करझाई
हमीद करझाई | |
कार्यकाळ २२ डिसेंबर २००१ – २९ सप्टेंबर २०१४ | |
उपराष्ट्रपती | अहमद झिया महसुद, मोहम्मद फहिम |
मागील | बुरहानुद्दीन रब्बानी |
पुढील | अश्रफ घनी |
जन्म | २४ डिसेंबर १९५७ कंदाहार, अफगाणिस्तान |
राजकीय पक्ष | अपक्ष |
पत्नी | झिनत कुरेशी |
गुरुकुल | हिमाचल प्रदेश विद्यापीठ |
धर्म | सुन्नी इस्लाम |
हमीद करझाई (पश्तो: حامد کرزی; फारसी: حامد کرزی; जन्म: २४ डिसेंबर इ.स. १९५७) हे अफगाणिस्तान देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष होते.
भारताच्या हिमाचल प्रदेशामध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर करझाईंनी अफगाणिस्तानमधील सोव्हिएत युद्धात मुजाहिदीन बनून अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीला मदत केली. करझाई व त्यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानचे शेवटचे राजा मोहम्मद झहीर शहा ह्याचे कट्टर पाठीराखे होते. १९९६ साली अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे प्रशासन सत्तेवर आल्यानंतर करझाईंने पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात स्थानांतर केले व तालिबान विरोधी चळवळीमध्ये जगातील महासत्तांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. २००१ मधील तालिबानच्या पाडावानंतर करझाई अफगाणिस्तानचे कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष बनले. २००४ व २००९ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय मिळवून करझाई सत्तेवर राहिले. ते राष्ट्राध्यक्षपदावर सप्टेंबर २०१४ पर्यंत होते.