हमिनस्तु
हमिनस्तु हा एक फारसी-अरबी शब्दसमूह आहे. 'इथेच आहे' हा त्याचा अर्थ आहे..
कवी अमीर खुसरोने जेव्हा पहिल्यांदा काश्मीर पाहिले तेव्हा तो उद्गारला : 'ग़र फ़िरदौस बर-रु-ए ज़मीं अस्त । हमिनस्तु, हमिनस्तु, हमिनस्तु!' अगर पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग (फ़िरदौस) असेल, तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे!
उर्दूच्या उच्चारण पद्धतीनुसार 'हमिनस्तु' हा शब्द हमिनस्तो, हमिनस्त, हमीनस्तो, हमीनस्त, हमि अस्तु, हमि अस्तो, हमि अस्त, हमी अस्तु, हमी अस्तो किंवा हमी अस्त असाही उच्चारता येतो.
चित्रपट
हमिनस्तु नावाचा एक हिंदी चित्रपट आहे. त्यातल्या एका गाण्याची सुरुवात अमीर खुसरोच्या याच ओळींनी झाली आहे. बाकीचे गाणे स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहे. गाणे झेब बंगेश याने गायले आहे. संगीत अमित त्रिवेदी यांचे आहे.
एकांकिका
लोकसत्ता लोकांकिका या २०१९ सालच्या ६व्या एकांकिका स्पर्धेत, रणजित पाटील/अजय कांबळे यांचे दिगदर्शन असलेली 'बुद्रुकवाडीचा मारुती बाटला' ही एकांकिका पहिली आली, औरंगाबादच्या सरस्वती भवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची ‘काळोखाचा रंग कोणता?’ ही द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली, तर पुण्याच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘टॅन्जेंट’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.
याशिवाय स्पर्धेत सादर झालेल्या उरणमधील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या 'हमिनस्तु' या एकांकिकेच्या लेखनासाठी प्राजक्त देशमुख याला सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक मिळाले. ह्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट संगीताचेही पारितोषिक प्रदान झाले.