हमिदाबाईची कोठी
हमिदाबाईची कोठी नाटककार अनिल बर्वे लिखित गाजलेले मराठी नाटक आहे. मराठी रंगभूमीला ‘हमिदाबाईची कोठी’मुळे एका समाजबहिष्कृत घटकाचं दर्शन घडले असे मानले जाते.
कथावस्तू
कोठीवरील गाणे बजावणे यांची संस्कृती अस्ताला जात असताना त्या विश्वात वावरणाऱ्या माणसांची झालेली शोकांतिका हा या नाटकाचा विषय आहे.
नाच व गाणे करणाऱ्या तवायफांच्या कोठ्या एकेकाळी साहित्य, काव्य, शायरी, साहित्यिक व शायर यांनी गजबजलेल्या असत असे मानले जाते. मात्र काही कारणांमुळे समाजात येथे जाणे चांगले न मानले गेल्या मुळे समाजातील उच्चभ्रू वर्गाचे तथील येणे-जाणे कमी होत गेले. बाजारू कलांमध्ये रस असलेल्या समाजाने त्यांचे स्थान घेतले. गाणे-बजावणे, नृत्य सादर करणाऱ्या कलावंतिणी आणि त्यांच्या पुढच्या पिढीवर याचा परिणाम झाला. उत्पन्नाचे कोणतेही चांगले साधन न उरल्याने त्यांना देहविक्रीचा व्यवसाय स्वीकारण्यावाचून गत्यंतर उरले नाही. हे सामाजिक स्थित्यंतर कसे घडत गेले, याचे चित्रण हमिदाबाईची कोठी मध्ये अनिल बर्वेनी केलेलं आहे.
मराठी रंगभूमीवरील प्रचलिततेला छेद देऊन मध्यमवर्गीय संवेदनांपलीकडे जाणारे नाटक, असे त्याचे वर्णन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे.