हमादान प्रांत
हमादान प्रांत استان همدان | |
इराणचा प्रांत | |
हमादान प्रांतचे इराण देशामधील स्थान | |
देश | इराण |
राजधानी | हमादान |
क्षेत्रफळ | १९,३६८ चौ. किमी (७,४७८ चौ. मैल) |
लोकसंख्या | १७,०३,२६७ |
घनता | ८८ /चौ. किमी (२३० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-13 |
हमादान प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-हमादान ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ १९,३६८ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६ च्या गणनेनुसार या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. हमादान हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.
हमादान प्रांताचा मुलूख डोंगराळ, पठारी आहे. झाग्रोस पर्वतरांगांचा घटक असणाऱ्या आल्वंद पर्वताची माळ हमादानाच्या वायव्येपासून नैऋत्येपर्यंत पसरली आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "हमादान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत). 2014-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-01 रोजी पाहिले.