Jump to content

हनुमा विहारी

हनुमा विहारी (१३ ऑक्टोबर, १९९३:काकीनाडा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हा भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेट पटु आहे. त्याने २०१० ते २०१६ दरम्यान हैदराबादकडुन खेळला तर सन २०१७ पासून तो आंध्र प्रदेशकडुन खेळतो. तर आयपीएल मध्ये हनुमा सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.

हनुमा विहारीचा जन्म 13 ऑक्टोबर 1993 रोजी काकीनाडा येथे तेलुगू बोलत देशस्थ ऋवेदी ब्राह्मण कुटुंबात झाला होता और. हे कुटुंब माधवाचार्य यांचे अनुयायी आहेत.

हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध ७ सप्टेंबर २०१८ रोजी लंडन (द ओव्हल) येथे खेळला.