हडपसर
?हडपसर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | हवेली |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
हडपसर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.
हे पुणे शहराचे उपनगर आहे. भाजीची विक्री आणि शेती हे येथील मुख्य व्यवसाय आहेत. हे उपनगर पुणे रेल्वे स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. येथून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ जातो.
उद्योग
येथे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत फोर्ज,गिट्स फूड प्रॉडक्ट्स, इंडियन ह्यूम पाइप फॅक्टरी, किर्लोस्कर उद्योग समूह व इतर अनेक उद्योग आहेत.
माहिती तंत्रज्ञान कार्यालये असलेले मगरपट्टा सिटी आणि भेकराईनगर यांमुळे हडपसरला महत्त्व प्राप्त झाले आहे.
हबीबगंज (भोपाळ) ते हडपसर यादरम्यान धावणारी एक खासगी मालकीची आगगाडी आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
येथील लोकीवनात वेगळा काही समवेश नाही पण सर्व साधारण आणि मराठी संस्कृती असलेलं जीवन येथील रहिवासी जगतात
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
हे सुद्धा पहा
- हडपसर रेल्वे स्थानक
- अण्णा साहेब मगर महाविद्यालय