Jump to content

हक्क

मनुष्याला जगण्यासाठी काही हक्कांची आवश्यकता असते.तसेच,उच्चतम व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही विशिष्ट हक्क आवश्यक असतात.हेरॉल्ड लास्की यांच्या मते,'हक्क म्हणजे, सामाजिक जीवनातील अशी परिस्तिथी, की ज्याच्याशिवय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकणार नाही.'

             हक्कांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.हक्कामुळे मनुष्याला प्रगती करण्याची सुयोग्य संधी प्राप्त होत असते.

अवैधानिक हक्क

या हक्काची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते. या हक्कांचे सार्वत्रिक स्वरूप असते.

नैसर्गिक हक्क

    नैसर्गिक हक्क आहे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग त्यांचे स्वरूप सार्वत्रिक आहे. जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क ही नैसर्गिक हक्कांची उदाहरणे आहेत.

नैतिक हक्क

    नैतिक हक्क व्यक्ती आणि समाजाच्या सदसदविवेकबुद्धीवर आधारलेले असतात. उदाहरणार्थ, शिक्षक आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना आदर मिळणे हा नैतिक हक्क आहे.

वैधानिक हक्क

वैधानिक हक्क राज्याकडून लोकांना दिले जातात. साधारणत: त्या हक्कांचे कायद्याच्या भाषेत संहितीकरण केलेले असते. या हक्कांचे स्वरूप सार्वत्रिक नसते. वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे शासन त्यांच्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवतात. वैधानिक हक्कांची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते.

      वैज्ञानिक हक्कांचे दोन प्रकार आहेत, ते खालीलप्रमाणे-

नागरी हक्क

नागरी हक्क व्यक्ती व्यक्ती आणि व्यक्तींची मालमत्ता यांच्याशी संबंधित नागरी हक्कांमध्ये जीविताचा हक्क,स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क यांचा समावेश होतो.राज्याकडून नागरी हक्कांचे संरक्षण केले जाते.

राजकीय हक्क

राजकीय हक्क व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मतदानाचा हक्क,निवडणूक लढवण्याचा हक्क,सार्वजनिक पदग्रहण करण्याचा हक्क, शासनावर टीका आणि विरोध करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश राजकीय हक्कांमध्ये होतो. सामान्यत: लोकशाही राज्यांत नागरिकांना राजकीय हक्क मिळतात.[]

  1. ^ Sajeva, Giulia (2018-06-28). When Rights Embrace Responsibilities. Oxford University Press. pp. 21–49. ISBN 978-0-19-948515-4.