Jump to content

हंगेरी

हंगेरी
Magyarország
हंगेरीचा ध्वजहंगेरीचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत:
हिम्नुस ('देवा, हंगेरियन जनतेवर कृपा असू दे.')
हंगेरीचे स्थान
हंगेरीचे स्थान
हंगेरीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बुडापेस्ट
अधिकृत भाषाहंगेरियन
सरकारसंसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखयानोस आदेर
 - पंतप्रधानव्हिक्तोर ओर्बान
महत्त्वपूर्ण घटना
 - स्थापना895 
 - हंगेरीचे राजतंत्र1000 
 - ऑस्ट्रिया-हंगेरीपासून अलग1918 
 - सद्य प्रजासत्ताक23 ऑक्टोबर 1989 
युरोपीय संघात प्रवेश१ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ९३,०३० किमी (१०९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७४
लोकसंख्या
 -एकूण ९८,७९,००० (७९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१०७.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २०२.३५६ अब्ज अमेरिकन डॉलर (४८वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२०,४५५ अमेरिकन डॉलर (४०वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८३ (अति उच्च) (३७ वा) (२०११)
राष्ट्रीय चलनहंगेरियन फोरिंट (HUF)
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१HU
आंतरजाल प्रत्यय.hu
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


हंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेनरोमेनिया, दक्षिणेला सर्बियाक्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

हंगेरीमध्ये सुरुवातीला केल्टिक संस्कृतीच्या जमातीचे वास्तव्य होते.नंतर रोमन साम्राज्याच्या आगमनानंतर हंगेरी रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला.इसवी सन ४३४ साली अटिला या हुणाच्या राजाच्या नेत्रुत्वाखाली हूण या टोळीने हंगेरीवर हल्ला केला.फ्रॅंक टोळीचा राजा शार्लमेनने जो कालांतराने पवित्र रोमन साम्राज्याचा संस्थापक बनला त्याने हूणाचा पराभव करून हूणाना पिटाळून लावले.कालांतराने जर्मन टोळ्यांनी हंगेरीवर हल्ला करून तेथे वास्तव्य केले. नवव्या शतकादरम्यान अर्पादच्या नेत्रुत्वाखाली सैबेरियामधून मग्यार जमात हंगेरीमध्ये स्थायिक झाली.ही एक मूर्तीपूजक जमात होती. गेझा या नेत्याच्या काळात या मूर्तीपूजक जमातीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. गेझाचा मुलगा पहिला स्टीफनने हंगेरीतील मग्यार जमातीच्या विविध टोळ्यांना एकसंघ करून हंगेरीचे राजतंत्र स्थापन केले.तो हंगेरीचा पहिला राजा होता.त्याच्यानंतर पहिला लाझलो ,कालमान इत्यादी कर्तुत्ववान राजे तेथे होऊन गेले.मंगोलानी हंगेरीवर हल्ला करून हंगेरीतील सैन्याचा पराभव केला व हंगेरीचा बराचसा प्रदेश जिंकून घेतला आणि यामध्ये हंगेरीच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला ठार मारले.हंगेरीचा त्यानंतर सत्तेवर आलेल्या राजा पहिला लुईने आपला बराचसा प्रदेश मंगोलापासून परत मिळवला व भविष्यातील अशा नुकसानापासून वाचवण्यासाठी मंगोल साम्राज्याला लागून असलेल्या सीमेवर भिंत बांधली व किल्ले बांधले. मंगोलानी पुन्हा हंगेरीवर हल्ला केला.यावेळी मात्र हंगेरियन सैन्याने मंगोलाचा पराभव केला.यानंतर मात्र मंगोलानी पुन्हा हंगेरीवर हल्ला केला नाही.इ.स १४५६ च्या लढाईमध्ये हंगेरियन सैन्याने ऑटोमन तुर्क साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला.मात्र इसवी सनाच्या १५व्या शतकामध्ये हंगेरीचे तत्कालिन राजे फारसे प्रभावी व कर्तुत्ववान नसल्यामुळे हंगेरीचे राज्य कमकुवत झाले. १५४१ ते १६९९ दरम्यान हंगेरीचा बराचसा प्रदेश ऑटोमन तुर्क साम्राज्य म्हणजे ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता व काही थोडा भाग ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग राजघराण्याने जिंकला होता. ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग राजघराण्याने ऑटोमन तुर्क सैन्याचा पराभव करून हंगेरीला आपल्या अधिपत्याखाली आणले. हंगेरीयन लोकांनी ऑस्ट्रियन अंमलाविरुद्ध इसवी सन १७०३-१७११ आणि १८४८ अशी दोनवेळा उठाव करून युद्धे केली.पहिल्या युद्धात ऑस्ट्रियन सैन्याने हंगेरीयन लोकांचा पराभव केला.तर दुसरे युद्ध हे ऑस्ट्रियाच्या विनंतीवरून रशियन सैन्याने हस्तक्षेप करून थांबवले.त्यावेळी म्हणजे १८६७ साली ऑस्ट्रिया कमकुवत झाल्याने ऑस्ट्रियाने हंगेरीबरोबर तह केला व ऑस्ट्रिया हंगेरी साम्राज्य अस्तित्वात आणले. इसवी सन १८६७ ते १९१८ सालांदरम्यान ऑस्ट्रिया-हंगेरी हे एक बालाढ्य राष्ट्र अस्तित्वात होते. पहिल्या महायुद्धामध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रिया-हंगेरीचे विघटन झाले व आजचा हंगेरी देश निर्माण झाला. पहिल्या महायुद्धामध्ये अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणाऱ्या हंगेरीने महायुद्ध संपल्यानंतर कम्युनिस्ट राजवटीचा स्वीकार केला. १९८९ साली हंगेरीमध्ये साम्यवादाचा अस्त झाला व संसदीय प्रजासत्ताक पद्धती चालू झाली.

सध्या प्रगत देशांपैकी एक असलेला हंगेरी संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना इत्यादी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

मध्ययुगीन इतिहास

अर्वाचीन हंगेरी

भूगोल

डॅन्यूब व तिसा ह्या हंगेरीमधून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत.

चतुःसीमा

हंगेरीच्या पूर्वेस रोमेनिया; दक्षिणेस सर्बिया, मॉँटेनिग्रो, क्रोएशिया; पश्चिमेस ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया व उत्तरेस स्लोव्हेकिया आणि युक्रेन हे देश आहेत.

राजकीय विभाग

राजकीयदृष्ट्या हंगेरीचे १९ काउंटीमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. राजधानी बुडापेस्ट हे शहर कोणत्याही काउंटीच्या आधिपत्याखाली येत नाही.

या काउंटींचे १६७ उप-विभागात विभागणी करण्यात आली आहे. या १६७ काउंटी व बुडापेस्ट शहराचे ७ गट करण्यात आले आहेत.

मोठी शहरे

शहरनागरी वस्तीउपनागरी वस्ती
बुडापेस्ट१७,२७,३००२५,५०,०००
देब्रेसेन२,०५,१००२,०५,१००
मिस्कोल्क१,८१,१००२,७०,०००
सेगेद१,६२,५००१,६२,५००
पेक्स१,५८,७००१,५८,७००
ग्यॉर१,२८,४००१,२८,४००
न्यिरेगिहाझा१,१६,२००१,१६,२००
केस्केमेत१,०६,५००१,०६,५००
झेकेस्फेहेर्वार१,०३,३००१,०३,३००

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

हंगेरीत हंगेरियन वंशाचे लोक बहुतांश (९४%) आहेत. याशिवाय रोमा (२.१%), जर्मन (१.२%), स्लोव्हेकियन (०.४%), रोमेनियन (०.१%) युक्रेनियन (०.१%) व सर्बियन (०.१%) व्यक्तीही येथे राहतात.

धर्म

इ.स. २००१ च्या वस्तीगणनेनुसार हंगेरीतील लोकांपैकी ५४.५% कॅथोलिक, १५.९% कॅल्व्हिनिस्ट, निधर्मी १४.५%, ल्युथेरन ३% व इतरधर्मीय २% आहेत. १०.१% लोकांनी आपला धर्म सांगण्यास नकार दिला.

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

संदर्भ