Jump to content

हंगा नदी

हंगा नदीचा उगम पारनेर शहराच्या पश्चिमेकडील समुद्र सपाटीपासून ९६० मीटर उंचीवरील कान्हूर पठाराजवळील दशाबाईच्या शिखराजवळ होतो. या नदीवर भीमा उजनी प्रकल्पाअंतर्गत हंगा लघुतलाव व विसापूर जलाशय आहे. या नदीवर हंगा येथे ब्रिटिश कालीन दगडी पूल आहे. या पुलावर ७२० मीटर उंचीचा बेंचमार्क आहे. या नदीवर श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे कुकडी कालव्याचा भव्य हंगा जलसेतू आहे. ही नदी पूर्वेकडे पारनेर हंगा जवळून वहात जाऊन हंगेवाडीजवळ घोडनदीला मिळते.व घोडनदी पुढे भीमा नदीस मिळते.