Jump to content

स्वाती राजे

स्वाती राजे या बालसाहित्याच्या अभ्यासक व लेखिका आहेत. 'भाषा' या संस्थेतर्फे फिरत्या ग्रंथालयाचा उपक्रम त्या राबवितात.

'इंटरनॅशनल बोर्ड आॅन फाॅर यंग पीपल' (इबी) या बालसाहित्यासाठी काम करणाऱ्या संस्थेतर्फे दिनांक ८ ते १२ सप्टेंबर, इ.स. २०१० या कालावधीत स्पेनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत 'ओरल ट्रेडिशन अँड मायनाॅरिटीज विदाऊट रिटन लिटरेचर' या विषयावरील चर्चासत्रात स्वाती राजेंनी भाग घेतला होता. त्यांनी दक्षिण आफ्रिका, स्वीडन, चीन, डेन्मार्क येथील परिषदातही बालसाहित्यविषयक निबंध सादर केलेले आहेत.