Jump to content

स्वाती पिरामल

स्वाती अजय पिरामल (२८ मार्च, १९५६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) या भारतीय उद्योजिका आहेत. या पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्षा असून त्यातील कंपन्यांद्वारे औषध आणि सार्वजनिक आरोग्य कार्यक्षेत्रात त्या काम करतात.

त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठ आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे झाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे.